पापविनाशक भृगुतीर्थ
भुईंज (ता.वाई जि.सातारा) च्या सौंदर्याचा गाभा म्हणजे कृष्णामाईचा घाट..! याच घाटावरील बुरुजावर हि मुर्ती कितीतरी काळापासून दुर्लक्षित आहे. खरंतर भुईंज या परिसराला फार मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पण तरीही भुईंजचा धार्मिक इतिहास हा भृगुऋषी या नावापासून सुरु होऊन शेवटी भृगुऋषी याच नावाजवळच येऊन थांबतो... गरुड आणि मारुतीसह लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णू हि मुर्ती आहे लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णुची..! समपाद अवस्थेत उभ्या असणाऱ्या चतुर्भुज मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख धारण केले असून खालच्या उजव्या हातात गदा (दंड) आणि डाव्या हाताने कटीवर बसलेल्या लक्ष्मीला सांभाळले आहे. या लक्ष्मी वल्लभाच्या उजव्या बाजूस गरुड तर डावीकडे हनुमान नमस्कार मुद्रेत उभे आहेत. विष्णु, गरुड आणि मारुतीने मुकुट परिधान केले असून लक्ष्मीच्या डोक्यावर मुकुट नाही तसेच कोणाच्याही गळ्यात व शरीरावर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. (किंवा कालौघात नष्ट झाले असावेत.) पण प...