Posts

Showing posts from August, 2019

महालक्ष्मीच्या पायरीला कृष्णामाईचा स्पर्श झाला आणि कोल्हापूर-सांगलीचा महापूर ओसरला

Image
भुईंजनिवासीनी (वाई.सातारा) महालक्ष्मी मंदिराच्या पाचव्या पायरीला कृष्णामाईच्या पाण्याचा स्पर्श झाला की महापूर व ओसरतो अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. अशीच एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे कृष्णजन्माची... आपल्या कृष्णजन्म कथेमध्ये असे आहे की कंसमामापासून वाचविण्यासाठी, पिता वसुदेव नवजात श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करायला नदीत शिरतो. यमुनेला महापूर आल्याने पलीकडे श्रीकृष्णाला सुखरूप न्यायचे कसे ? पाण्याची पातळी तर वेगाने वर चढत असते. पण ज्याक्षणी पाण्याचा स्पर्श, श्रीकृष्णाच्या पायांना होतो त्याच क्षणी चमत्कार घडतो. देवाचा चरणस्पर्श झाल्यावर यमुना नदीच्या पुराचे पाणी वेगाने ओसरते आणि वसुदेव आपल्या श्रीकृष्णाला सुरक्षितपणे पलीकडे घेऊन जातो. द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली मकरंद करंदीकर यांच्या संग्रहातील एक ...

काय आहे कृष्णा, कऱ्हा, खंडोबा आणि सिद्धनाथ यांचे परस्परांशी नाते..

Image
कृष्णा कोयनेचं.... चांगभलं... भुईंज.. "या पवित्र गावात माझा जन्म झाला हे माझ्या अनेको जन्मांचे पुण्य असावे" हे मला खरे वाटू लागले आहे. अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या या नगरीचा धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. याच्या जितके खोलात जाऊ तितक्याच नवीन गोष्टी हाताशी लागताहेत..         अशीच एक पिठ्यांपिठ्या चालत आलेली परंपरा म्हणजे "सिद्धनाथाचे कृष्णा स्नान". तसे पाहता भुईंज क्षेत्राचा सिद्धनाथाशी दूराण्वये काही संबंध नाही. पण अगदी फलटण तालुक्यातील " काळज " पासून ते दौंड तालुक्यातील " यवत " (जि.पुणे) इ. ठिकाणचे सिद्धनाथ दैवत असणारे गावकरी श्रावणातील पौर्णिमेआधी भुईंजला कृष्णामाईचे जल घ्यायला येतात. (विशेष म्हणजे कृष्णेचे हे पाणी फक्त भुईंज मधूनच नेले जाते)              सिद्धनाथ ग्रामदैवत असलेल्या गावांतील तरुण १००-१२५ कि.मी. ची पायी दौड करत भुईंज मध्ये येतात. पावसाळ्यात उफाळणाऱ्या कृष्णेचे पात्र पौर्णिमेपर्यंत कमी झाले असले तरी पाण्याला भरपूर ओढ असते. या उफाणत्या पाण्यात पटापट डुबक्...

३० एप्रिल १९४५ च्या घटनेनंतर हिटलर जिवंत होता का ? इव्हा ब्राऊन आणि एडोल्फ हिटलर यांनी खरंच आत्महत्या केली होती का?

Image
  #द_सेव्हन्थ_सिक्रेट ३० एप्रिल १९४५ च्या घटनेनंतर हिटलर जिवंत होता का ? इव्हा ब्राऊन आणि एडोल्फ हिटलर यांनी खरंच आत्महत्या केली होती का?                 हुकुमशाहांबद्दल एक वेगळंच आकर्षण पहिल्यापासून माझ्या मनात होतं. त्यांचा रंजक उदयास्त मला शालेय जीवनापासून मोहित करतो आहे. मध्यंतरी अचानक हुकुमशाहांबद्दल वाचण्याची लहर आली. त्याच शोधात हातात पडलेली रहस्यमय कादंबरी म्हणजे आयर्विंग वॅलेस लिखीत आणि विजय देवधर अनुवादित "द सेव्हन्थ सिक्रेट..."                 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या 'आधुनिक इतिहास' या विषयाचे प्राध्यापक डॉ. सर हॅरीसन अॅशक्रॉफ्ट त्यांचं चौदावं आणि अविस्मरणीय पुस्तक "हेर हिटलर" हा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याच्या तयारीत होते. त्यातच पश्चिम बर्लिनमधुन आलेल्या एका पत्राने त्यांची झोप उडवली. त्याच पत्राच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यांनी थेट बर्लिन गाठले आणि तीथेच त्यांचा अपघाती ' खून ' झाला.                  या सर्व घट...

श्रीहरी विष्णूच्या छातीवर लाथ मारणारे, महालक्ष्मीचे वडील, भृगू संहितेचे जनक आचार्य भृगूऋषी कोण होते ?

Image
आचार्य भृगूऋषी महाराज हजारो वर्षांपासून श्री # भुईंज तिर्थक्षेत्री समाधीस्थ असणारे ऋषीश्रेष्ठ आचार्य भृगूऋषी महाराजांच्या समाधी मठ वर्धापनदिन सोहळा रथसप्तमी दिवशी साजरा केला जातो. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज." ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा ) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. हिंदू मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा "भृगू संहिता" हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत. "भार्गव" गोत्रिय लोक भृगूंचे वंशज मानले जातात. भृगुंना प्रजापती दक्ष पुत्री "ख्याती" पासून "धाता" आणि "विधाता" हे दोन पुत्र आणि "जगदंबा महालक्ष्मी" ही कन्या झाली. तसेच "काव्यमाता" पासुन ...

पश्चिम महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर, भुईंज

Image
  महालक्ष्मी मंदिर, भुईंज  मंदिराची निर्मिती नक्की कधी झाली हे सांगता येत नाही, पण श्री देवी पुराण, श्री स्कंद पुराण आणि श्री भृगू संहितेत भुईंज या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. कुंभमेळ्या नंतर साधू कृष्णेत पवित्र स्नान करून याच ठिकाणी काही काळ वास्तव्य करतात. दक्षिण देशातून आलेल्या आषाढी दिंड्यांसाठी आणि ज्ञानोबांच्या पालखीच्या मानाच्या अश्वांसाठी इथला मुक्काम महत्त्वाचा असतो. धार्मिक माहिती :-              सप्तर्षींपैकी आद्य ऋषी ज्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली असे आचार्य श्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराजांची संजीवन समाधी इथे आहे. तसेच आपल्या वडिलांना समाधी घेण्यापासून थांबवायला आलेल्या आणि त्यांच्याच आदेशावरून भुईंजमधे थांबलेल्या वैकुंठस्वामिनी जगदंबा महालक्ष्मीचेही पुरातन मंदिर आहे. याच भृगू मठात द्वापार युगात श्री कृष्णाने काही काळ वास्तव्य केले होते. मंदिराची रचना :            मंदिर कोणी व केव्हा बांधले याची नोंद सापडत नाही. वेळोवेळी अनेकदा य...
Image
|| श्री ||