Posts

Showing posts from July, 2020

सातपाटील‌ कुलवृत्तांत

Image
सातपाटील‌ कुलवृत्तांत माणूस हा मुळातच भटका प्राणी..! शेतीचा शोध लावून त्याने काहीशी स्थिरता शोधाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते त्याला अजूनही जमले नाही हे आजही मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांवरुन अगदीच स्पष्ट आहे.           तब्बल ८०० पानांच्या "सातपाटील कुलवृत्तांत" मध्ये अशी अनेको संक्रमणे सामावून घेताना लेखक रंगनाथ पठारे यांनी वाचकांना ७०० वर्षांच्या कालभ्रमंती सोबत इंग्लंड, अफगाणिस्तान पासून सातारच्या करंजे गावापर्यंतची स्थलभ्रमंती अगदी सहजपणे घडवून आणली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा आवाका असूनही कोणताही धागा कुठेही सुटताना दिसत नाही. प्रत्येक घटना आणि पात्र गुलमोशीच्या फुलात फुल गुंफून तयार केलेल्या सुंदर हाराप्रमाणे हळूवार गुंतवलेले आहे. कादंबरीतील पहिले पात्र श्रीपती हे देवगिरी सत्तेच्या अखेरच्या काळातील तर शेवटचे पात्र देवनाथ एकविसाव्या शतकातील असूनही कुठेही सांस्कृतिक सरमिसळ झालेली दिसून येत नाही. याऊलट साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव या सर्व नायकांचे अनुक्रमे निजामशाही, पानिपत युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, इंग्र...

क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव.

Image
क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव. रणमस्तबहाद्दर लखुजीराजे यह व्यक्ती महाराष्ट्र के इतिहास का अविभाज्य अंग हैं | परकीय रियासतोंके अत्याचारोंसे कुचले हुवे महाराष्ट्र भूमीकों स्वराज्य की प्रेरणा देणेवाले वीर के रुप में लखुजीराजेकों देखा जाता है | उनका संपूर्ण जीवन अपने लोगोंको एकजूट कर स्वराज्य की निव रखने में व्यतीत हुवा |           भारत के गौरवशाली साम्राजोमें देवगिरी के यादव साम्राज्य का स्थान हमेशा ही ऊँचा रहा है | इसी साम्राज्य के आखरी सम्राट शंकरदेवराय यादवजीको अल्लाउद्दीन खिलजीके गुलाम मलिक कफुरने छलसे हराया और देवगिरी की सत्ता हस्तगत कर ली | राजा रामदेवराय की मौत तो पहलेही इ.स. १३१० में हो चूकी थी और इस युद्ध में इ.स. १३१२ को राजा शंकरदेवराय को भी वीरगती प्राप्त हुयी | सम्राट रामदेवराय के जमाता राजा हरपालदेवनें खिलजी कें खिलाफ उठाव कियाँ किंतू उनकी बढेही निर्घृणतासें कफूर द्वारा हत्या कर दी गयी | सम्राट शंकरदेवराय के बेटे गोविंददेव जाधवजीने अनेको बार अपना राज्य फिरसे हासिल करने की कोशिश की | दुर्भाग्यसे ...

गावकुसावरील देवता

Image
गावकुसावरील देवता  माणसाच्या सांस्कृतिक अस्तित्वापासुन देवतांचे अस्तित्व आहे असे इतिहास सांगतो तर देवतांनी सृष्टी निर्माण केली असे धर्म सांगतो. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भिती, प्रेम, इच्छा यांच्या माध्यमातून  निसर्गपुजक सभ्यतेने देवत्वाचा आकार घेतला. शेंदूर फासलेले दगड आणि त्यांच्यात पुजले जाणारे देवत्व न बघितलेला एकही मराठी/भारतीय व्यक्ती भेटणार नाही. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर देवत्वात सुद्धा बदल होत गेले ओबडधोबड दगडांचे देव मुर्त आकार घेऊ लागले. पण यातून काही देव पिछाडीवर पडले आणि गावातून निघून वेशीवरचे धनी झाले. मरीआई साधारणतः प्रत्येक गावाच्या वेशीवर मांग वाड्यात  मरीआई हि स्त्री देवता असते. या देवतेला मरीआई-महालक्ष्मी काही ठिकाणी जरी-मरी, कडकलक्ष्मी, महामारी तर कोकणात गांवदेवी म्हटले जाते. मातंग समाज हा या देवीचा पुजारी असतो. शेंदूर फासलेले अनेक दगड मंदिरात असतात पैकी दोन मोठे पाषाण या दोन देवींच्या नावाने पुजले जातात. "मारी" हा दक्षिणी तमिळ शब्द असून तो वर्षावाचक आहे,ती पर्जन्य देवतेला वर्षनशील बनवते ती मारी असे मत दिवगंत रा. चिं. ढेरे ह्या...