Posts

Showing posts with the label Sangavade

नरसोबा | सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत

Image
 नरसोबा  सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत  आपल्याकडे बहुतांश समाजात शक्यतो भैरवस्वरुप शैव (शिव‌-अवतारी) कुळदैवते आढळतात, तर खास करुन कोकणस्थ ब्राह्मणांमध्येच वैष्णव (विष्णू अवतारी) कुळदैवते असतात. विष्णूचा चतुर्थ अवतार असलेला नरसिंह/नृसिंह तर ब्राम्हणांचेच कुळदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात कर्नाटक सीमाभागात हाच नरसिंह नरसोबा रुपात ब्राम्हणांसह मराठा तसेच बारा बलुतेदार समाजासोबतच जैनांचे देखील कुळदैवत आहे.  महाराष्ट्रात विविध कालखंडात बांधलेली नरसिंहाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, ज्यामध्ये केवल-नरसिंह, उग्र नरसिंह, लक्ष्मी नरसिंह अशा प्रकारातील नरसिंहाच्या मुर्ती स्थापित आहेत. ज्या दशावतारी विष्णूच्या चौथ्या अवताराची साक्ष देतात.  नरसोबाचे या नरसिंहाहून स्वतःचे असे एक वेगळेपण आहे. याची स्थाने प्राचीन असून ती तांदळा स्वरुपात आहेत. विशेष म्हणजे नरसोबा या रुपात तो फक्त विष्णू-अवतार नसून त्यात रुद्रांश (शिव-अंश) देखील असल्याचे मानले जाते. अर्थात हा नरसोबा विष्णू आणि शिवाचे एकत्रित स्वरुप आहे. दशावताराहून पलिकडे हा नरसोबा एक लोकदैवत म्हणून खंडोबा/जोतिबा प्रमाण...