Posts

Showing posts with the label #khandoba pali

पालीचा खंडोबा

Image
श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रा  पाली-पेंबर पालाईच्या भक्तीने शंभूघळीतला महादेव तारळी नदीकाठी प्रथमच मार्तंड भैरव नावाने द्विलिंग (जोडलिंग) रुपात शक्तीसहीत अवतरला. पुढे जेजुरीवर मणीमल्लाचा वध करुन मल्हारी नावाने पाली गावात देवांनी पहिली संसार लिला रचण्याचा निर्धार केला. याच कारणाने पाल-पेंबर हे क्षेत्र लोकपरंपरेत आणि वाघ्या मुरळीच्या कवनांमध्ये खंडोबाचे मुळठाण (मूलस्थान) म्हणून प्रसिद्ध झाले. नेवासे येथील तिमशेठ वाणी यांची माता पार्वती व मोहिनी यांचा एकत्रित अवतार असलेली कन्या म्हाळसा हिच्यासोबत देवांचा विवाह निश्चित झाला. पौष महिन्याच्या मृग नक्षत्रावर मुळठाण पाली येथे दोघांचा विवाह पार पडला.  (काहींच्या मते हा घटनाक्रम उलटा घडला अर्थात आधी लग्न व नंतर पालाईस दर्शन पण असे झाल्यास पालीत देवांनी विवाह सोहळा घडवण्याचे कारण प्रयोजनच मिळत नाही.) दुसरा एक मतप्रवाह असा की, पाली गावाचे मुळ असलेले पेंबर हे गाव प्रेमपुरी या नावाचा अपभ्रंश आहे. प्रेमपुर शब्दाचा पेंबर असा अपभ्रंश झाला असे काही ग्रंथ व जुने माहितगार लोक सांगतात.  त्यांच्या मते सप्तर्षींच्या तपास प्रसन्...