आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज
आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज आणि कृष्णा-वेण्णा-कोयनादी पंचगंगा उत्पत्ती.. गणपती हे निराकार परब्रह्माचे साकार स्वरुप असून याच ॐकार गणपतीपासून ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आणि संपूर्ण चराचर सृष्टी उत्पन्न झाली अशी धारणा असणाऱ्या व श्री महागणपतीची उपासना करणाऱ्या उपासकांना ‘गाणपत्य’ म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मातील पाच प्रमुख संप्रदायांपैकी गाणपत्य हा एक आहे. याच गाणपत्य संप्रदायांचा आद्य ग्रंथ समजला जाणाऱ्या ‘श्री गणेश महापुराणाची’ रचना आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी महाराजांनी केली. हे गणेश महापुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला स्फुरले त्यांनी ते वेदव्यासांना सांगितले. व्यासांनी त्याचा उपदेश भृगुऋषींना केला आणि पुर्वजन्मव्याधिने ग्रस्त सौराष्ट्राचा राजा सोमकांताला उपदेश करताना महर्षी भृगू यांच्या संवादातून श्री गणेश महापुराणाची रचना झाली. आचार्य श्रेष्ठ भृगुऋषी महाराज गणेश पुराणाच्या सुरुवातीच्या आध्यायांमध्ये जी कथा येते ती याप्रमाणे - सौराष्ट्रातील देवनगरचा राजा सोमकांत पुर्वजन्म कर्माने व्याधीत ...