Posts

Showing posts from May, 2020

संजीवन गुप्तहेर ०५

Image
संजीवन गुप्तहेर ०५ कचचे मन सुकर्ण कडे असले तरी त्याचे डोळे अजूनही त्याच दृष्याकडे पाहत होती. कचला तेथून आपली नजर हटवणे अशक्यप्राय वाटत होते. ते सौंदर्य आपल्या नजरेतून त्याला सुटू द्यायचे नव्हते. कच आणि सुकर्णची धडपड त्या युवतीच्या कानावर गेली आणि कच सोबत तिची नजरानजर झाली. त्या निळ्या डोळ्यांच्या अथांग सागरात कचचे काळेभोर डोळे अलगद बुडून गेले. दोघांचीही नजर एकमेकांसोबत बांधली गेली इतकी घट्ट.. की दोघांनाही ती काही केल्या सोडवत नव्हती‌.. तेवढ्यात सुकर्ण कचचा दंड पकडून त्याला ओढत आश्रमाकडे नेऊ लागला. एक तिरस्कृत कटाक्ष सुकर्णकडे टाकून कच पुन्हा मागे वळून पाहू लागला.. ती देखील याला वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होती.                  आता दोघेही एकमेकांच्या नजरेआड गेले होते. सुकर्णची बडबड अजूनही सुरुच होती, पण कचचे त्याकडे थोडेही लक्ष नव्हते. "अरे कच लवकर चल.. आश्रमात.." त्याला मधेच थांबवत "ते सोड.. सुकर्ण ती कन्या कोण होती ?" असे कच विचारु लागला. "आचार्यांची कन्या.. देवयानी..!"    ...

संजीवन गुप्तहेर ०४

Image
संजीवन गुप्तहेर ०४ एका छोट्याशा टेकडीच्या माथ्यावर पोहचल्यावर समोर विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला आश्रम कचच्या नजरेस पडला. त्या आश्रमाची व्याप्ती पाहून कच अवाक् झाला होता. बाहेरच्या बाजूस युद्ध प्रशिक्षण वर्ग तर आतील बाजूस शास्त्राभ्यास सुरु होता. मद्यपी, मांसाहारी, असंस्कृत आणि वीभत्स असे कच ने मनोमन ठरवलेल्या आश्रमाचे रुप इथे दूरवर कुठेही दिसत नव्हते. 'एका असंस्कृत जमातीला इतके सुसंस्कृत बणवने, त्यांच्यात एकी निर्माण करणे हिच शुक्राचार्यांची सर्वात मोठी उपलब्धी असावी' असा विचार करत तो टेकडी उतरु लागला. कच आश्रमाच्या व्दाराजवळ आला तोच त्याची नजर आश्रमाच्या मधोमध असलेल्या भल्यामोठ्या वृक्षराजाखाली आपल्या शिष्यांमध्ये ध्यानस्थ बसलेल्या एका तेजस्वी पुरुषाकडे गेली. "हेच शुक्राचार्य असणार !" अशी त्याची खात्री पटली आणि तो थेट त्यांच्या दिशेने चाल करु लागला.                 आश्रमातील सर्व शिष्य, विविध राक्षस आणि मानव वंशातील राजपुत्र कच कडे विस्मयकारक नजरेने पाहत होते. पहिल्यांदाच त्यांनी एक ऋषीपुत्र या आश्रमात...

संजीवन गुप्तहेर ०३

Image
संजीवन गुप्तहेर ०३ बृहस्पतींचे निर्वाणीचे शब्द ऐकून कच घामाने डबडबून गेला. 'राक्षस म्हणजे आक्राळ विक्राळ देहाचे कुरुप आणि निर्दयी लोक असतात, ते देवता, मानव व ऋषीगणांवर फक्त अत्याचार करतात' अशाच कथा लहानपणापासून कचने ऐकलेल्या होत्या. त्यामुळे राक्षसांचे गुरु शुक्र देखील तसेच असतील या विचाराने कचच्या पुर्ण शरीराला कापरे भरले होते. तो अक्षरशः थरथरत होता. बृहस्पतींनी कचच्या खांद्याला धरुन त्याला आपल्या पाया जवळून उठवून आपल्या शेजारी बसवले. आपल्या उपरण्याने त्याच्या चेहऱ्यावर फुटलेला घाम टिपला. आणि बोलू लागले..                 "बाळ कच , घाबरु नकोस.. शुक्र माझा बालपणीचा सवंगडी आहे. तो फारच मायाळू आणि शांत मनाचा व्यक्ती आहे. पण तो जितका शांत तितकाच महत्त्वकांक्षी आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी तो जिवाचे रान करतो. त्याची संजीवनी विद्या प्राप्त करण्याची मेहनत पाहून जगाला त्याच्या ध्येयवेडेपणाचे दर्शन घडलेच आहे. त्याच्या आश्रमात तुला कोणताच धोका उद्भवणार नाही.." हे धीराचे शब्द ऐकून कचच्या जीवात जीव आला....

संजीवन गुप्तहेर ०२

Image
संजीवन गुप्तहेर ०२ ओंजळीतून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत "ॐ भूर् भुव: स्व:" हे गायत्री मंत्राचे शब्द हवेत विलीन होत होते. अर्ध्य संपल्यावर त्याने अलगद झुकून सुर्यदेवास नमस्कार केला. कोवळ्या सुर्याच्या किरणांनी त्याचा गोरापान देह हिरण्यवर्णी भासत होता. काठावर उभे असणारे देवगुरु बृहस्पती देखील काही काळ आपल्या पुत्राकडे बघतच राहिले. साक्षात एखाद्या स्वरूपवान गंधर्वानेच आपल्या पोटी जन्म घेतला असवा असा त्यांना भास झाला.                 डोळे उघडताच कच'ला त्याच्या पित्याचे दर्शन झाले. पाण्यातून बाहेर येताना काठावर ठेवलेले वस्त्र उजव्या बाजूने आपल्या पाठीवरुन घेत फिरवून डाव्या खांद्यावर टाकत आपल्या पित्याला त्याने प्रणाम केला. कितीतरी दिवसांनी आपल्या पित्याला समोर पाहून कच फारच आनंदी झाला होता. कधी आपले पिता इंद्रदरबारातून माघारी येतील आणि आपण त्यांचे शिष्यत्व पत्करुन ऋषी पदी जाण्याच्या आपल्या ध्येयाच्या बाजूने पहिले पाऊल टाकतोय याची तो गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत होता. आज तो दिवस उगवल्याने त्याचा चेहरा विलक्षण तेजाने भरला होता. पण बृहस्पतींच्...

संजीवन गुप्तहेर ०१

Image
संजीवन गुप्तहेर ०१ तो काळच मुळात फार धामधुमीचा होता. सुख, आनंद, चैन या भोगविलासी गोष्टींपेक्षाही फक्त जिवंत राहणे तेव्हा जास्त महत्त्वाचे होते. सर्वत्र रक्ताचे पाट वाहत होते. रणांगणावर पडलेल्या अगणित मृत शरीरांच्या लगद्याला तुडवत एक धीरगंभीर आकृती पाऊले टाकीत होती. सहस्त्र सूर्यांप्रमाणे तेजस्वी असणारा तो चेहरा आज फारच कष्टप्रद दिसत होता. काठोकाठ भरलेल्या दुःखाश्रुंनी डोळ्यांचा बांध फोडला होता. डोळ्यातून ओघळलेले अश्रु गालावरुन खाली वाहत काहीश्या पिकलेल्या काळपट पांढऱ्या दाढीत एकरुप होत होते. डोळे पाण्याने डबडबले असले तरी त्यात एक विलक्षण आग दिसत होती. ती आग होती प्रतिशोधाची ! त्याने परिधान केलेले धवल चंद्रासारखे शुभ्र वस्त्र अनेक ठिकाणी लालबुंद झाले होते. पांढऱ्या पितांबराच्या सोग्यातून रक्ताचे थेंब पाझरत होते. हातात घेतलेल्या एका विशिष्ठ प्रकारच्या काठीवर भार देत त्या भक्कम देहाचे मार्गक्रमण सुरुच होते. कोण होता तो तेजस्वी पुरुष ?                   तो जगाविरुद्ध जगणारा पुरुष होता भृगून...

संजीवनगुप्तहेर..

संजीवनगुप्तहेर.. एक कथा घेऊन येतोय, पहिल्या गुप्तहेराची.. त्याच्या प्रेमाची.. प्रतिशोधाची.. असीमीत त्यागाची.. चातुर्याची आणि बलिदानाची..               गुप्तहेर हा शब्द ऐकताच "बहिर्जी नाईक" हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि आचार्य चाणक्य या दोघांनी गुप्तहेरांचा पुरेपूर वापर करत त्यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळातही भारताची रॉ, पाकिस्तानची आयएसआय, इस्राईलची मोसाद अशा गुप्तहेर संघटना रात्रंदिवस कार्यरत असतात. संरक्षण क्षेत्रातील त्यांचे महत्व नव्याने सांगायला नको.               पण पुराणांमध्येही आपल्याला एका गुप्तहेराची कथा आढळते. आजच्या सारखीच प्रेम, प्रतिशोध, धारिष्ट्य आणि उत्सुकतेने भरलेली... महाभारत, मस्त्य पुराण आणि अग्नीपुराणात या कथेचा उल्लेख येतो. त्यामुळेच कदाचित या कथेच्या नायकाला 'पहिला गुप्तहेर' म्हणून ओळखले जात असावे.               कथेचा पहिला भ...

भारतवर्ष के सम्राट हिंदूपदपातशहा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज...

Image
भारतवर्ष के सम्राट हिंदूपदपातशहा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज...                                                          वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः |                   सा मूर्तिरिव वामनी |  शंभूसुतोरिव |                          मुद्रा शिवराजस्य राजते ||                                          - श्रीशाहूछत्रपति (पहिले) अर्थात : विष्णूरुपी वामन'की उत्तरोत्तर बढनेवाली प्रतिकृती की तरह शंभूराजाजी के पुत्र शिवाजी (शाहू) महाराज की मुद्रा राज्य (राज्यविस्तार) करें | छत्रपती शाहू महाराज (पहिले) स्वराज्य के दुसरे छत्रपती संभाजी महाराज के पुत्र शाहू राजा का जन्म १८ मे १६८२ में हुवां | ११ मार्च १६८९ में छत्रपती संभाजी महा...