Posts

Showing posts with the label #आरती

" घालीन लोटांगण " या प्रार्थनेची अज्ञात माहिती !

Image
"घालीन लोटांगण" या प्रार्थनेची अज्ञात माहिती !  ( एक श्लोक मराठी, बाकी संस्कृत ! )                          महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही पूजेनंतर आरत्या म्हणतो. आरत्यांच्या नंतर '' घालीन लोटांगण वंदीन चरण " ही  प्रार्थना म्हणतो. आज वर्षानुवर्षे -- पिढ्यानपिढ्या हा क्रम अव्याहत सुरूच आहे. यातील पहिल्या चार ओळी या शुद्ध मराठीत असून पुढची सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत आहे. असे का ? हा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडायचा. कित्येकांना मी विचारले तरी उत्तर सापडले नाही. ही अशी प्रार्थना कुणी सुरु केली, कुणी रचली ? पहिल्या मराठी श्लोकाच्या शेवटी " म्हणे नामा " असल्यामुळे हा श्लोक संत नामदेव महाराजांचा, यात कांही वाद नाही. मग पुढचे सर्व संस्कृतमध्ये कसे ? आपल्या आधीची पिढी म्हणत होती ना, म्हणून आपण सर्वजण  " बाबा वाक्यम प्रमाणम " असे म्हणून तेच पुढे सुरु ठेवतो. मी देखील वर्षानुवर्षे श्रद्धेने म्हणत राहिलो पण याबद्दलचे औत्सुक्य कायम होते. माझ्यासारखा हाच प्रश्न आणखी कांहींना पडला असणारच आणि कुठेतरी याचे उत्तर ...