Posts

Showing posts from February, 2024

देवराज्य आणि देवभाषा

Image
 “ संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत (मराठी) काय चोरापासून झाली " असे संत एकनाथ महाराज संस्कृतास मोठेपण देऊन मराठीस दुय्यम स्थान देणाऱ्या पढतमुर्खांना खडसावून विचारतात. मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबा तर अजिबात थकत नाहीत, "माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके ||" म्हणत देवाच्या मुखीचे ज्ञान अमृतसम  देवभाषेत ' भावार्थदीपिका ' अर्थात ज्ञानेश्वरी च्या रुपाने त्यांनी या देवराज्यास सुलभ केले.              सातवाहन हे सर्वात प्राचीन मराठी भाषिक राज्यकर्ते समजले जातात. मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती' हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. तर मुकुंदराजाने इ.स. १११० च्या सुमारास ' विवेकसिंधु ' हा वेदांतावरील टीकात्मक ग्रंथ लिहिला. या कालखंडात पर्यंत मराठी हि देववाणी इथल्या जनमाणसांची सामान्य वापरातील भाषा झाली होती तथापि धर्मग्रंथांवर अजूनही संस्कृताचा पगडा फार मोठा होता. त्यामुळे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना समजेल अशा मराठी बोलीतून क...