एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान
एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान एकाच परब्रह्म ईश्वराला मानणाऱ्या लोकांना एकेश्वरवादी म्हणतात. जगात आजवर अनेक एकेश्वरवादी धर्म-पंथ उदयास आले. यात एकच निराकार ईश्वर मानणारे किंवा एका प्रमुख ईश्वराच्या अधिपत्याखाली इतर देव मानणारे असे उपप्रकार केले जाऊ शकतात. भारतात देखील असे अनेक धर्म वेळोवेळी उदयास आल्याचे आणि पुढे जाऊन या भुमीतील शास्वत बहुऐश्वरवादात विलीन झाल्याचे पहायला मिळतात. इ.स.पुर्व ५०० मध्ये बहुऐश्वरवादी मिस्रच्या (इजिप्त) गुलामगिरीत असलेल्या बहुऐश्वरवादी यहुदी लोकांमध्ये मुसा (मोझेस) याने त्यांच्या देवांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या 'यहोवा' ने एका पर्वतावर आपल्याला नवीन धर्माज्ञा दिल्याचे सांगितले. काही धर्मगुरूंनी तोच प्रचार लावून धरला आणि एकेश्वरवादाची बीजे रोवली. पुढे गुलामगिरीतून मुक्त होऊन जेरुसलेमला आलेल्या यहुदींनी बहुऐश्वरवादाचा आणि मुर्तीपुजेचा तिरस्कार करत एकमेव निराकार निर्गुण ईश्वराची सत्ता मान्य केली. मुसा आणि त्यानंतर झालेल्या विविध नबींनी बायबलचा जुना करार प्रसिद्ध केला. लवकरच सर्व लोक या 'खऱ्या धर्माचे' आश्रित होतील या विश्वासाने त्यांनी ...