Posts

Showing posts from September, 2021

आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज

Image
आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज मी भुईंज मध्ये जन्मलो, या गावाला नावच मुळात ज्या व्यक्तीमुळे पडले ते आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज यांच्याबद्दल कायमच मनात एक उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून शोध घेताना अनेक नवनवीन गोष्टी माझ्या समोर येत त्याच आज वाचकांसमोर मांडत आहे. भुईंज येथील आचार्य भृगुऋषींची समाधी भृगुऋषींचे मुळ स्थान फारस (इराण) समजले जाते. हिंदू मान्यतेनुसार साधारणतः इ.स. पूर्व साडेचार हजार ते सात हजार वर्षांपूर्वी भृगूंचा जन्म झाला असावा. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे  "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज."  ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा  "भृगू संहिता"  हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आह...

रामदासी आणि सातारचे छत्रपती

Image
 रामदासी आणि सातारचे छत्रपती समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते या वादात आपल्याला पडायचे नाही. कोणताही इतिहासकार समर्थांच्या गुरु असण्याला दुजोरा देत नाही. तथापि रामदासी संप्रदाय हा आजचा आपला विषय आहे. साधारणतः छत्रपती थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात रामदासी संप्रदायाचे प्रस्थ बरेच वाढले होते. राजवाड्यासह साधारणतः साताऱ्यातील प्रत्येक सरदाराच्या वाड्यातील देवघरात ' श्रीराम ' रामदास स्वामी आणि कल्यान स्वामींच्या मार्फत विराजमान झाले. चाफळ हे या संप्रदायाचे प्रमुख स्थान. इथून समर्थांची गादी गुरुशिष्य परंपरेने चालत असे. आजच्या घडीला सातारकर छत्रपतींसाठी श्रीराम आणि समर्थ रामदास हे वंदनीय आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्याच्या त्यांच्या अनेक पत्र व पत्रिकांची सुरुवात ' श्री सद्गुरु समर्थ प्रसन्न ' या घोषवाक्याने होत असते. (पुढे देणार असलेली घटनाच छत्रपतींच्या या रामदासी प्रेमाचे कारण असावे असा अंदाज बांधता येतो.)  फोटो : छत्रपती महाराज शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबाराजे यांच्या लग्नपत्रिकेचा मायना, ज्यात श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न असा उल्लेख आहे.  ...

पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती..

Image
 कुंपणच जेव्हा शेत खातं..  पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती.. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य मंदिरावर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी कळस चढवला. 'अहद् तंजावर तहद् पेशावर अवघा मुलुख आपला' म्हणत शाहू महाराजांनी आलम हिंदुस्थान आपल्या छत्राखाली घेतला.. शाहू छत्रपती निपुत्रिक असल्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात कोल्हापूरचे पदच्युत छत्रपती शिवाजी यांचे चिरंजीव व छत्रपती ताराबाईंचे नातू 'रामराजा' यांना दत्तक घेऊन गादीचे वारसदार बनवले.                 छत्रपती रामराजा यांचेसोबत पंतप्रधान बाळाजी बाजीराव भट उर्फ नानासाहेब याने 'सांगोला करार' केला. यान्वये छत्रपतींची सर्व सत्ता पुणेकरांच्या ताब्यात जाऊन छत्रपती नामधारी बनले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 'पगार' ठरवून देण्यात आला. याहूनही पुढे जाऊन शाहू छत्रपतींच्या काळात सातारा नगरीचे रहिवासी झालेले छत्रपती अजिंक्यतारा किल्ल्यावर 'नजरकैदेत' ठेवण्यात आले. छत्रपती रामराजांना वेडे ठरवून तर पुढे त्यांचे दत्तक पुत्र छत्रपती दुसरे शाहू हे दोघेही याच कैदेत ठार झाले. किल्ले ...

फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती..

Image
फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती..  राजवाड्यासमोरील गोल बागेत असणारी ही सदरची मुर्ती मला आधी छत्रपती थोरल्या शाहूंची वाटायची..  साताऱ्यात निवांत गादीवर बसून आयुष्य काढलेल्या व्यक्तीचा मृत्यूपश्चातही गादीवर निवांत बसलेलाच पुतळा बांधला हे बघून मित्रांमध्ये कुश्चीत हसायचो मी..  सातारा नुसती नावाला राजधानी छत्रपतींच्याने साध्या एका शहराचा विकास सुद्धा साधता आला नाही.. छत्रपती संभाजी हेच शेवटचे कर्तबगार छत्रपती त्यांच्यानंतरचे बाकीचे फक्त नामधारी.. इतर संस्थानिक बघा आणि आमचा सातारा बघा, आदबो-तहजीब तर सोडाच साध्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा यांच्याच्याने राखता आल्या नाहीत..  हळूहळू शाहू छत्रपतींचे कार्य समजले. पण बाकी वंशजांचं काय..‌? ते नावापुरतेच ना ? छत्रपतींची गादी का कुणालाच कर्तबगारीने चालवता आली नाही ? राजवाढ्यापुढे फक्त नावातच प्रताप असणाऱ्या या प्रतापसिंहांचा हा पुतळा का उभारला असेल ?  अशा भावना अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत मनात होत्या आणि मला विश्वास आहे की ९५% महाराष्ट्र आणि ९९% सातारकरांच्या याच भावना आहेत. पण सातारा गादीच्या स्थापने पुर्वीपासून आजपर्यंत...