छत्रपती गादी
छत्रपती गादी भाग २ हिंदू धर्मशास्त्रानुसार दत्तक पुत्र पोटच्या पुत्राइतकाच औरस मानला जातो आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये समानच असतात. साधारणतः रक्ताचा किंवा स्वकुळातील मुलगा दत्तक घेण्याचा दंडक प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पाहिले की शिवछत्रपतींनंतर सातारा गादीवर चौथ्या पिढीत तर करवीर गादीवर तिसऱ्याच पिढीत दत्तक वारस विराजमान झाले. दोघेही स्वकुळातील अर्थात भोसले कुळातीलच होते. छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनंतर नानासाहेब पेशव्याने सातारचे सर्वाधिकार पुण्यास हलवल्यावर पेशव्यांची सत्ता उन्मत्त होऊ लागली. सातारा व करवीर अशा दोन्ही छत्रपतींना आपले स्वातंत्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी पेशव्यांशी दिर्घकालीन लढा द्यावा लागला. सातारच्या शाहूपुत्र छत्रपती रामराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी वावीकर भोसले घराण्यातील विठोजी भोसले या मुलास दत्तक घेऊन त्यांचे दुसरे शाहू असे नामकरण केले. आपल्या दत्तक पित्याप्रमाणे छत्रपती दुसरे शाहू अर्थात आबासाहेब महाराज फक्त नामधारी राज्यकर्ते होते. पुण्यात प्रधान पेशव्यांमध्ये सत्तासंघर्षाचा कलह माजला होता, सवाई माधवरावास पेशवा केल्यावर बा...