Posts

Showing posts from June, 2020

हैबतबाबा पवार आरफळकर

Image
आषाढी पालखी सोहळ्याचे मालक श्रीमंत सरदार संत हैबतबाबा पवार आरफळकर  परमार वंशीय धार पवारांची एक शाखा आरफळ (ता.जि. सातारा) येथे आली. अनेकांच्या मते हि शाखा राजा धवलसिंह परमार यांची असून ती ढवळ - नांदवळ मार्गे आरफळ येथे आली. वरकरणी पाहता आरफळ गाव पवारांनीच वसवल्याचे लक्षात येते. पवारांचे कुलदैवत असणारी धारची  गडकालीका माता अर्थात काळुबाई हेच गावचे ग्रामदैवत ! तसेच गावची वंशपरंपरागत पाटीलकी देखील पवारांकडेच आहे. उत्तरकाळात आरफळ हे छत्रपतींच्या खाजगीतील गाव होते. आजही सातारा छत्रपतींच्या जमीनी आरफळ मध्ये आहेत. पवारांच्या निंबाळकर, धारेराव, जगदाळे अशा अनेक उपशाखा महाराष्ट्रभर आहेत.           आरफळकर घराणे सरदार संत हैबतबाबांमुळे नावारुपाला आले. हैबतराव पवार ग्वाल्हेरकर शिंद्यांकडे आघाडीचे सरदार होते. लष्करात असुनही बाबांची पांडुरंग आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींवर नितांत श्रद्धा होती. याच भक्तभावनेतून लष्कर सोडून ग्वाल्हेरहून आरफळकडे परतताना त्यांना एका भिल्ल राजाने कैद केले. हा भिल्ल राजा निपुत्रिक होता. हैबतबाबांना कैद केले असता पांड...

" घालीन लोटांगण " या प्रार्थनेची अज्ञात माहिती !

Image
"घालीन लोटांगण" या प्रार्थनेची अज्ञात माहिती !  ( एक श्लोक मराठी, बाकी संस्कृत ! )                          महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही पूजेनंतर आरत्या म्हणतो. आरत्यांच्या नंतर '' घालीन लोटांगण वंदीन चरण " ही  प्रार्थना म्हणतो. आज वर्षानुवर्षे -- पिढ्यानपिढ्या हा क्रम अव्याहत सुरूच आहे. यातील पहिल्या चार ओळी या शुद्ध मराठीत असून पुढची सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत आहे. असे का ? हा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडायचा. कित्येकांना मी विचारले तरी उत्तर सापडले नाही. ही अशी प्रार्थना कुणी सुरु केली, कुणी रचली ? पहिल्या मराठी श्लोकाच्या शेवटी " म्हणे नामा " असल्यामुळे हा श्लोक संत नामदेव महाराजांचा, यात कांही वाद नाही. मग पुढचे सर्व संस्कृतमध्ये कसे ? आपल्या आधीची पिढी म्हणत होती ना, म्हणून आपण सर्वजण  " बाबा वाक्यम प्रमाणम " असे म्हणून तेच पुढे सुरु ठेवतो. मी देखील वर्षानुवर्षे श्रद्धेने म्हणत राहिलो पण याबद्दलचे औत्सुक्य कायम होते. माझ्यासारखा हाच प्रश्न आणखी कांहींना पडला असणारच आणि कुठेतरी याचे उत्तर ...

संजीवन गुप्तहेर ०८

Image
संजीवन गुप्तहेर ०८ "अनेक देवतांच्या मनात असणारे महत्कार्य आज तुझ्याकडून घडले आहे. राक्षसगुरुंच्या मृत्यूने सहजपणे राक्षसांचे समुळ उच्चाटन होईल यात दुमत नाही. तुझे मनोरथ देखील पुर्ण झाले आहे. तेव्हा आता उठ आणि चल येथून..." असे विचार त्याच्या मनात येत असताना समोर दिव्याच्या मंद प्रकाशात पर्णकुटीतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह त्याला अगदीच निष्काम भासत होता. त्या मृतदेहाच्या मुखकमलावरचे स्मितहास्य मिणमिणत्या प्रकाशातही तेजोमय भासत होते. ते दृष्य पाहून कच मधील शिष्य आता जागा झाला. "शुक्राचार्य फक्त तुझे गुरुच नाहीत तर त्यांनी तुला दोन वेळा पुनःरोज्जीवित केले आहे. आज तुझ्यासाठी ते बलिदान द्यायलाही तयार झाले. त्यांनी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला. शत्रुचा पुत्र आहेस हे माहित असूनही तुझ्यासोबत दुजाभाव केला नाही." असा त्याच्या आतील शिष्य त्याला ठणकावून सांगत होता. शेवटी अंतरीचा शिष्य वरचढ ठरला आणि कचने शुक्राचार्यांना पुनः जिवंत करण्याचा निर्णय घेतला.                   पर्णकुटीची कवाडं उघडून कच बा...

संजीवन गुप्तहेर ०७

Image
संजीवन गुप्तहेर ०७ देवयानीची विविध पुष्पांप्रती असणारी आसक्ती आता कचने पुरेपूर ओळखली होती. त्यातच वर्षातून फक्त एकदाच उमलणारे अतिशय दुर्मिळ असे हे वसंतमुखीचे पुष्प तीचे सर्वात आवडते होते. कचने हिच कडी पकडून आपली योजना आखली होती. आपल्या योजनेत कच इतका व्यग्र झाला होता की आपला शत्रु देखील आपल्यावर नजर ठेवून आहे याचा त्याला विसर पडला होता. दुसऱ्या प्रहरीच कच देवयानीचा निरोप घेऊन निबीड अरण्यात वसंतमुखीच्या शोधात निघून गेला. त्याच्यावर पाळत ठेवून असणारे राक्षस देखील सावध झाले होते. 'देवगुरुंचा पुत्र राक्षसगुरुंचा पट्टशिष्य होतो' हि सल अनेक राक्षसांच्या मनात रुतत होती.                 दुरवर अरण्यात त्याला वसंतमुखीचा दरवळ जाणवला. तो त्या दिशेने वाटचाल करु लागला. समोर वसंतमुखीचे सुंदर पुष्प कचच्या नजरेस पडले. किती सुंदर होते ते निसर्गाचे धन... पुष्प तोडण्यासाठी कचने आपला हात हळुवारपणे त्याच्या देठास घातला तेवढ्यात खड्गाच्या एका जोरदार प्रहारासह त्या फिकट रंगाच्या पुष्पावर रक्ताची गर्द लाल चिळकांडी उडाली आणि क...

संजीवन गुप्तहेर ०६

Image
संजीवन गुप्तहेर ०६  एक भयानक हास्य कचच्या कानावर पडत होते. असह्य वेदनांनी कच विव्हळत होता. अचानक एक जोरदार लाथ कचच्या हृदयाजवळ बसली. "आ...." अशा मोठ्या किंकाळीसह त्याचे डोळे खाडकन उघडले गेले. तो चारही बाजूंनी राक्षसांनी घेरला गेला होता. त्यातील एकाने कचचे बाहू पकडून त्याला उभे केले तेवढ्यात रक्ताच्या चिळकांडी सोबत एक खड्ग कचच्या पोटातून आरपार गेले. पुन्हा एक रक्ताची उष्ण उबळ त्याच्या तोंडून बाहेर पडली. काही कळायच्या आतच असंख्य खड्ग त्याचे शरीर पुन्हा पुन्हा क्रुरपणे भेदू लागले. त्या निर्दयी हास्यासोबत कच गतप्राण झाला.                जसे सुर्य मावळून अंधाराचे सावट दाटू लागले तसे सुकर्ण आणि देवयानी यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कच सोबत नक्कीच काहीतरी बरे वाईट घडले असणार या विचाराने दोघांनी आचार्यांकडे धाव घेतली. आचार्यांचा चेहरा लालबुंद झाला. त्यांना आपल्या आज्ञेची अवहेलना कदापि सहन होत नसे. त्यातच त्यांना कच कडून अशी अपेक्षा नव्हती. तरीही त्यांनी आश्रमातील शिष्यांना कचचा शोध घेण्याची आज्ञा केली. अथ...