Posts

Showing posts from June, 2022

श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज

Image
 श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज आज गंगा दशहरा निमित्त भृगुभुमीतील श्रीविष्णुरुपिणी कृष्णामाईच्या काठावरील विस्मृतीत गेलेल्या चंद्रेश्वर महादेवाची ओळख करून घेऊ..  सिद्धेश्वर-चंद्रेश्वर महादेव, भुईंज आपल्या सर्वांना एक गणेशकथा माहिती आहेच, स्कंदपुराणात पंधराव्या अध्यायात ही कथा देवर्षी नारदमुनी ऋषीगणांना सांगतात. ज्यात आपल्या पिटुकल्या मुषक वाहनावरुन कैलासी जात असता महाकाय बाल गणेशाचा तोल जाऊन तो ढासळतो. त्याला पाहून आकाशातील चंद्र हसतो आणि गणपतीला राग येतो. आपल्या स्वरुपाचा गर्व असलेला चंद्रमा गणपतीच्या बेढब शरीरावरुन त्याला चिडवतो अशी काही ठिकाणी माहिती मिळते. चिडलेला गणपती " येत्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तू या जगातून अदृश्य होशील, निष्प्रभ होशील. शुद्ध चतुर्थीला (विनायकी चतुर्थी) जो कुणी तुला पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल " असा श्राप देतो.                  चंद्र शापित झाला हे पाहून ब्रह्मदेव तिथे येतात आणि कैलासावर जाऊन गजाननाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात.  आदिमूर्ति गजानना ॥ ब्रह्मा विष्णु शिवकारणा ॥  मंगलधामा सनातन...