Posts

Showing posts from February, 2025

छत्रपती गादी

Image
छत्रपती गादी  भाग ४ (अंतिम)  इकडे सातारच्या दोन्ही छत्रपतींना १८५७ च्या उठावात सहभागी असल्याने कराची व अहमदनगर येथे नजरकैदेत ठेवले होते. पैकी छत्रपती प्रतापसिंहा चे दत्तकपुत्र तिसरे शाहू उर्फ जंगली महाराजां ना जुलै १८५८ ला सोडण्यात आले. पुढे ते पुणे येथे भवानी पेठेत राहू लागले तिथेच १ जून १८९२ रोजी त्यांचे निधन झाले.  तर छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांचे दत्तकपुत्र छत्रपती व्यंकोजीराजे हे देखील कैदेतून सुटून साताऱ्यात आले. व्यंकोजीराजे हे शिवरायांचे चुलते शरीफजीराजे यांच्या वंशातील असले तरी ते सामान्य कुटुंबातील म्हणून तत्कालीन रेसिडेन्ट फ्रेयर याने आक्षेप घेतला होता, त्यामुळे छ. आप्पासाहेबांनी त्यांच्या कुटुंबास १८४३ मध्ये ' राजाज्ञा ' पदवी बहाल केली होती. भूतपूर्व छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेबांच्या तिन्ही राणीसाहेब व इंग्रजांनी छत्रपती व्यंकोजीराजेंना छत्रपतींच्या सर्व संपत्ती, अधिकार व बिरुदावल्यांचे वारस म्हणून घोषित केले होते. (तथापि  छत्रपतींची बहुतांश स्थावर मालमत्ता इंग्रजांनी जप्त करुन घेतली होती.) छत्रपती व्यंकोजीराजेंचे २३ डिसेंबर १८६४ रोजी निपु...

छत्रपती गादी

Image
छत्रपती गादी  भाग ३  पहिल्या भागात आपण छत्रपती गादीच्या स्थापनेच्या आणि स्थिरतेच्या काळातील संघर्ष बघितला तर दुसऱ्या भागात पेशव्यांविरुद्ध दोन्ही गाद्यांचा लढा आणि रोगापेक्षा जालीम झालेले इंग्रजी औषध बघितले आता तिसऱ्या भागात इंग्रज वावटळीतही तग धरुन राहिलेल्या चिवट छत्रपती गादीचा संघर्ष पाहूयात... इंग्रज कंपनी सरकारने सातारची गादी खालसा केल्याचे पत्रक काढले असले तरी सातारच्या दोन्ही छत्रपतींना वंश मंजूर केला होता व त्यान्वये मृत छत्रपतींच्या राण्या व वारसांना थोड्याशा मालमत्तेसह तनखा सुरु केली होती. छत्रपतींचे निवासस्थान असलेला जुना राजवाडा व नवा राजवाडा देखील सरकारजमा झाले होते. यावरुनच इग्रजांचा दुटप्पीपणा लक्षात येतो की, विधीपूर्वक दत्तक विधान झाले असताना तसेच ते कागदोपत्री देखील कायदेशीररीत्या बरोबर असताना फक्त राज्य गिळंकृत करण्याच्या हेतूने इंग्रजांनी सातारच्या दोन्ही छत्रपतींना गादीवर दत्तक नामंजूर केले पण त्यांना वंशज म्हणून मान्यता दिली.  प्रतापसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी इंग्रजांकडून सातारला परत येण्याची परवानगी मिळवली. १८५४ साली छत्रपत...

पालीचा खंडोबा

Image
श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रा  पाली-पेंबर पालाईच्या भक्तीने शंभूघळीतला महादेव तारळी नदीकाठी प्रथमच मार्तंड भैरव नावाने द्विलिंग (जोडलिंग) रुपात शक्तीसहीत अवतरला. पुढे जेजुरीवर मणीमल्लाचा वध करुन मल्हारी नावाने पाली गावात देवांनी पहिली संसार लिला रचण्याचा निर्धार केला. याच कारणाने पाल-पेंबर हे क्षेत्र लोकपरंपरेत आणि वाघ्या मुरळीच्या कवनांमध्ये खंडोबाचे मुळठाण (मूलस्थान) म्हणून प्रसिद्ध झाले. नेवासे येथील तिमशेठ वाणी यांची माता पार्वती व मोहिनी यांचा एकत्रित अवतार असलेली कन्या म्हाळसा हिच्यासोबत देवांचा विवाह निश्चित झाला. पौष महिन्याच्या मृग नक्षत्रावर मुळठाण पाली येथे दोघांचा विवाह पार पडला.  (काहींच्या मते हा घटनाक्रम उलटा घडला अर्थात आधी लग्न व नंतर पालाईस दर्शन पण असे झाल्यास पालीत देवांनी विवाह सोहळा घडवण्याचे कारण प्रयोजनच मिळत नाही.) दुसरा एक मतप्रवाह असा की, पाली गावाचे मुळ असलेले पेंबर हे गाव प्रेमपुरी या नावाचा अपभ्रंश आहे. प्रेमपुर शब्दाचा पेंबर असा अपभ्रंश झाला असे काही ग्रंथ व जुने माहितगार लोक सांगतात.  त्यांच्या मते सप्तर्षींच्या तपास प्रसन्...