भृगुऋषींची आरती
भृगुऋषींची आरती श्री क्षेत्र भुईंज त्रिभुवनी पावन | समाधिस्थ भृगूऋषी तिथे संजिवन || चंद्रिका-कृष्णा संगमी इंदू वळण | तेथे त्वा केलेसी अजरामर स्थान ||१|| जय देव जय देव, जय ऋषी महर्षी भृगुऋषी राजा | आरती ओवाळू सायुज्य द्विजा || धृ.|| जय देव जय देव कल्पारंभी जेव्हा ब्रह्म गडबडला | सप्तर्षी प्रजापती भार्गव निर्मिला || मंदाकिनी स्थापूनी निश्चिंत केला | लत्थाघाते विष्णू चरणी लागला ||२|| जय देव जय देव, वेद स्मृती शास्त्र पुराणे रचली | अवनीवरती आद्य अग्नी चेतविली || दर्शनमात्रे नवग्रह पिडा हरली | नारायण आण्णांनी समाधी उद्धरली ||३|| जय देव जय देव, गाणपत्य शैवा वैष्णव आधारा | देव मानव राक्षस चराचर उद्धारा || महालक्ष्मी तिष्ठली पाठी निर्धारा | भक्तगण स्वप्नील मुक्तीपथी तारा ||४|| जय देव जय देव, अर्थ तिन्ही लोकात पवित्र समजले जाणारे भुईंज नावाचे एक तिर्थक्षेत्र आहे. तिथे आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी संजीवन समाधी घेऊन आजही नित्यनेमाने तप करत आहेत. (स्कंदपुराण) चंद्रिका आणि कृष्णेच्या संगमी संपूर्ण विष्णू रुप असलेली कृष्णा नदी परम् पवित्र असे चंद्राकार वळण घेते. तेच स्थान तुम्ही (भृगुऋषी...