एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान

एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान

एकाच परब्रह्म ईश्वराला मानणाऱ्या लोकांना एकेश्वरवादी म्हणतात. जगात आजवर अनेक एकेश्वरवादी धर्म-पंथ उदयास आले. यात एकच निराकार ईश्वर मानणारे किंवा एका प्रमुख ईश्वराच्या अधिपत्याखाली इतर देव मानणारे असे उपप्रकार केले जाऊ शकतात. भारतात देखील असे अनेक धर्म वेळोवेळी उदयास आल्याचे आणि पुढे जाऊन या भुमीतील शास्वत बहुऐश्वरवादात विलीन झाल्याचे पहायला मिळतात. 


इ.स.पुर्व ५०० मध्ये बहुऐश्वरवादी मिस्रच्या (इजिप्त) गुलामगिरीत असलेल्या बहुऐश्वरवादी यहुदी लोकांमध्ये मुसा (मोझेस) याने त्यांच्या देवांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या 'यहोवा' ने एका पर्वतावर आपल्याला नवीन धर्माज्ञा दिल्याचे सांगितले. काही धर्मगुरूंनी तोच प्रचार लावून धरला आणि एकेश्वरवादाची बीजे रोवली. पुढे गुलामगिरीतून मुक्त होऊन जेरुसलेमला आलेल्या यहुदींनी बहुऐश्वरवादाचा आणि मुर्तीपुजेचा तिरस्कार करत एकमेव निराकार निर्गुण ईश्वराची सत्ता मान्य केली. मुसा आणि त्यानंतर झालेल्या विविध नबींनी बायबलचा जुना करार प्रसिद्ध केला. लवकरच सर्व लोक या 'खऱ्या धर्माचे' आश्रित होतील या विश्वासाने त्यांनी धर्मदीक्षा किंवा धर्मांतरण सुरु केले. त्यांचीच री ओढत मी ईश्वराचा पुत्र आणि शेवटचा नबी आहे हे सांगत येशुने इ.स.च्या १ ल्या शतकात ख्रिस्ती धर्मास जन्म दिला तर बहुऐश्वरवादी अरब समाजात जन्मलेल्या मुहम्मद यांनी यदुही धर्माचीच तत्वे उचलून अरबांच्या अल्लाह (सृजनकर्ता) या देवाला प्रमुख ईश्वर मानून, मीच शेवटचा पैगंबर (ईश्वरचा दूत) आहे असे सांगत इ.स. च्या ५ व्या शतकात इस्लामची स्थापना केली. 

           "ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह" म्हणजेच अल्लाह शिवाय इतर कोणी पुजनीय नाही, मुहम्मद त्याचे (शेवटचे/प्रमुख) पैंगबर आहेत, हा मुहम्मदांनी पेरलेला शहादा मुस्लिमांना कट्टरता प्रदान करतो. येशुचा मीच ईश्वराचा पुत्र आणि शेवटचा दूत आहे तर मुहम्मदाचा मीच अल्लाहचा शेवटचा आणि प्रमुख पैंगबर आहे ही प्रतिपादने ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांना तलवारीच्या किंवा इतर कोणत्याही जोरावर जगभरात धर्मांतरण आणि क्रूसेड/जिहाद करायला उद्युक्त करतात. 



पण दक्षिण भारतातील दख्खनी मुसलमान या अब्राहमी धर्मांच्या वादळात स्वतःची एक वेगळी आब राखून आहे. भारतातील पहिली मशिद मुहम्मदांच्या हयातीतच केरळ मधील कोडंगल्लुर येथे केरळचा राजा चेरामन पेरुमल याने इ.स. ६२९ मध्ये उभारली होती. महाराष्ट्र देखील मुसलमान आधी समुद्रामार्गेच आले. भारतात येता येता इस्लामचे स्वरुप फारच बदलले होते. मुहम्मदांनी विखुरलेल्या अरबांना एका देवाखाली आणले असले तरी भारतात येताना त्यांना संस्कृती दिली ती फारसी लोकांनी. मशिद हे प्रार्थनास्थळ असले तरी तिथे ईश्वराचे कोणतेही प्रतिक पुजले जात नव्हते. पण “मनुष्याचा मेंदू फार हलका असतो त्यामुळे त्याला टेकण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रतिकाची गरज पडतेच.” याच तत्वाने मुस्लिमांनी त्यांच्या सहाबा आणि इतर धर्मप्रचारकांच्या, फकिरांच्या कबरींमध्ये ते प्रतिक, तो आधार शोधला. इस्लाममध्ये कुफ्र असणारी व्यक्ती पुजा किंवा प्रतिक पुजा नकळतपणे भारतात येताना त्यांनीच स्वीकारली. 

            उत्तर भारतात अरबी तुर्की या सुन्नी मुसलमानांनी सत्ता स्थापन केली तर दख्खनेत बहमनी ही शियांची सत्ता अस्तित्वात होती. पैकी सुन्नी मुसलमान अतिशय कट्टर असून शिया काही प्रमाणात समावेश होते. याच बहमनीच्या पुढे निजाम, अदिल, कुतुब, इमाद आणि बरीद अशा शाखा निर्माण झाला. यांच्या दरबारात देखील सरदारांमध्ये शिया व सुन्नी वाद कायम होता. मुघल हे सुन्नी मुसलमान होते तर औरंगजेब हा त्यांच्या कट्टरतेचा परचम होता. दख्खनेतील मराठे, आदिलशाह आणि कुतुबशहा अशा सर्वच 'काफीरांचा' नायनाट करायला औरंगजेबाने दख्खनेची मोहीम हाती घेतली होती. आदिल आणि कुतुब हे शिया बुडवायला तर त्यांच्याच सुन्नी पठाण सरदारांनी औरंगजेबाला मदत केली होती. उत्तर भारतीयांच्या मते दक्षिणेतील, तर अरबी, तुर्कींच्या मते पुर्ण भारतातीलच मुसलमान अजलाफ (खालचे/बाटगे) आहेत. तर ते स्वतः शुद्धवंशी अशराफ आहेत. 

            

दख्खनेच्या भुमीतील उपजत समावेशकता इथल्या मुसलमानांना देखील भारतीय संस्कृतीचेच पूत बनवते. मराठी मुसलमानांची इथल्या गावगाड्याशी जोडलेली नाळ तर अगदी अतुट आहे. त्यांची स्वतःची‌ हिंदी मिश्रित स्थानिक मराठी बोली भाषा आहे. अगदी आपल्या एका पिढीच्या मागे बुरखा किंवा हिजाब आणि गोल जाळीची टोपी ही पद्धत नव्हतीच. आपल्या आजी किंवा आईच्या वयाच्या बायका सहावार/न‌ऊवार साडी, डोक्यावर कानामागून घेतलेला पदर, गळ्यात जाडसर काळ्या मण्यांची पोत, हातात पोपटी बांगड्या याच रुपात आजही दिसतील. पुरुषांमध्ये थोडा आपरा पण घळघळीत लेंगा, शर्ट, वाढलेली दाढी आणि डोक्यावर थोडी मोठी जरा वेगळ्या धाटणीची गांधी टोपी हाच मुळ पेहराव होता. दारुल उलूम देवबंद आणि अलिकडेच २० व्या शतकात सुरु झालेल्या सुन्नत उल 'जमात' सारख्या उत्तर भारतीय मोहिमांनी मराठी मुस्लीमांच्या डोक्यात कीड भरली. मुळच्या संपन्न मराठी आणि भारतीय मुस्लीमांच्या डोक्यात वाळवंटी अरबी संस्कृतीची बीजे पेरायला सुरुवात केली. (माझ्या एका ओळखीच्या मुस्लीम मित्रामध्ये जमातला गेल्यावर झालेला बदल आणि कट्टरता मी जवळून अनुभवली आहे. तो शिया असून देखील.) 

               खरंतर आपण महाराष्ट्र भुमीचे मुसलमान आहोत. मुळातच आपण सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न आणि समावेशक असताना आपल्याला तुच्छ समजणारी वाळवंटी विचारधारा आपल्या मनावर बिंबवून घेण्याची काही एक गरज नाही. इथल्या मुस्लिमांचे बहुतांश व्यवसाय हिंदू सण उत्सवांवर चालतात. अनेक हिंदू देवस्थाने आणि चालीरीतींमध्ये इथल्या मुस्लिमांचे मानपान आहेत. अनेक मुस्लीम पीर फकिरांच्या यात्रा सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करतात. सनांना पुरणपोळी आणि ईदाला शिरखुर्मा आजही एकमेकांना पोचता होतो. कित्येक मुस्लीम नवरात्र करतात. काहींच्या घरी तर आजही देवतांचे टाक आहेत आणि नवरतनात घट देखील बसतो. हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमात "बया.. आमच्या देवाला वो कपाळपे कुंकु नै चलताय.. इधर गळेपर लगाव तो.." म्हणत उत्साहात सहभागी होणाऱ्या भाभी आजही त्याच आपुलकीने आपल्यात आहेत. 


माझं इतकंच सांगणं आहे की, जमात, देवबंदी व इतर अशा कोणत्याच उत्तर भारतीय व अरबी लोकांच्या नादाला लागून आपल्या समृद्ध संस्कृतीचा ऱ्हास करुन घेऊ नका. त्यांच्या नजरेत तुम्ही खालचे/तुच्छ आहात कारण इराक इराण पाकिस्तान या मुस्लीम राष्ट्रांमध्ये मुस्लीमांमध्येच परस्परांवर होणारे हल्ले याच मानसिकतेतून होतात. 


माझा एक मुसलमान मित्र म्हणायचा तसे आपण “मराठा-मुसलमान” आहोत याची कायम आठवण ठेवा.. 

#ईद_मुबारक 

#रणमस्तबहाद्दर 

                                    ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता