महालक्ष्मीच्या पायरीला कृष्णामाईचा स्पर्श झाला आणि कोल्हापूर-सांगलीचा महापूर ओसरला




भुईंजनिवासीनी (वाई.सातारा) महालक्ष्मी मंदिराच्या पाचव्या पायरीला कृष्णामाईच्या पाण्याचा स्पर्श झाला की महापूर व ओसरतो अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. अशीच एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे कृष्णजन्माची...




आपल्या कृष्णजन्म कथेमध्ये असे आहे की कंसमामापासून वाचविण्यासाठी, पिता वसुदेव नवजात श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करायला नदीत शिरतो. यमुनेला महापूर आल्याने पलीकडे श्रीकृष्णाला सुखरूप न्यायचे कसे ? पाण्याची पातळी तर वेगाने वर चढत असते. पण ज्याक्षणी पाण्याचा स्पर्श, श्रीकृष्णाच्या पायांना होतो त्याच क्षणी चमत्कार घडतो. देवाचा चरणस्पर्श झाल्यावर यमुना नदीच्या पुराचे पाणी वेगाने ओसरते आणि वसुदेव आपल्या श्रीकृष्णाला सुरक्षितपणे पलीकडे घेऊन जातो.


द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली मकरंद करंदीकर यांच्या संग्रहातील एक अनोखी वस्तू म्हणजे 'वसुदेव प्याला ' !



या दोन्ही गोष्टींवर आधारित करंदीकरांकडे ४ वसुदेव प्याले आहेत. फोटो क्रमांक १ मध्ये आपल्याला हा वसुदेव प्याला पाहता येईल. या प्याल्यामध्ये आपण पाणी ओतू लागल्यावर पाण्याची पातळी वाढत जाते. श्रीकृष्णाच्या पायाला स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी , पूर्ण प्याला रिकामा होईपर्यंत या प्याल्याला तळाशी असलेल्या छिद्रातून वाहून जाते. हा प्याला घडविणाऱ्या आपल्या जुन्या कलाकाराला हे वैज्ञानिक तत्व माहिती होते की नाही. पण त्यांनी या मूर्तीतच एक वक्रनलिका तयार केली आहे त्यामुळे आपोआपच siphon क्रियेने, पाणी पूर्णपणे ओसरते / वाहून जाते.




फोटो क्र. ४ मधील काचेच्या पारदर्शक वसुदेव प्याल्यातून वैज्ञानिक तत्व समजायला सोपे जाते.
राजापूरमध्ये अचानक अवतरणारी गंगा ही देखील या सायफन तत्वावर आधारीत असावी. सोबत या सर्व वस्तूंचे प्रत्यक्ष कार्य दाखविणारी ध्वनिचित्रफीत आहे. ती आपण जरूर पाहावी.

             


पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की पाणी कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. हेच तत्त्व (siphon) लक्षात घेऊन हजारो वर्षांपूर्वी महालक्ष्मी मंदिराची बांधणी केली गेली असावी. त्यामुळेच पाणीपातळीपासून १५-२० फूट उंचीवरील या पायऱ्यांना पाण्याचा स्पर्श होताच कृष्णा पुन्हा शांत होते.
आपल्याला लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा.


मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#रणमस्तबहाद्दर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता