अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा...


एक अपरिचित इतिहास...‌ 


अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा...




        आदिलशाहीच्या मदमस्त हत्ती अफजल खानाने तुळजापूर, पंढरपूर आपल्या पायाखाली तुडवत कृष्णेच्या खोऱ्यात वाईमध्ये तळ ठोकला. मराठ्यांना कायमच हाताशी धरून राहिलेल्या आदिलशाहीचे हे क्रौर्याचे स्वरुप सर्वांसाठीच नवीन होते. पण अफजल खान मदोन्मत्त हत्तीप्रमाणे चौखूर उधळत होता त्याला अंगावर घेण्याची हिम्मत करायला कोणीच तयार होत नव्हते. औरंगजेबाला कैद करण्याची मनीषा बाळगणारा अफजल खान किती ताकदवान असेल याची कल्पना करता येते.

               असा हा खान वाईला अजगरासारखा विळखा घालून बसला होता. यातच वाईतील सर्वात सधन कसबा असणाऱ्या भुईंजवर अफजल खानाची सैतानी नजर पडली नसती तर नवलच... इकडे शिवरायांशी प्रतागडावर गाठीभेटी ठरत होत्या तर तिकडे खानाचे सैनिक भुईंज मध्ये घुसत होते. यातच जाधवरावांचे कर्ते पुरुष गावात नव्हते, पण जाधवरावांच्या गौरवशाली परंपरेनुसार जाधवरावांच्या स्त्रीयांनीच कमरेला पदर खोचून तलवारी हातात घेत शत्रूला समोरे जायचे ठरवले. रात्रीच्या अंधारात गावभर पसरलेले खानाचे एक एक करत शेकडो सैनिक कैद करून #जाधवराव वाड्याच्या तळघरात कोंडायला सुरुवात केली आणि मग तळघरात कोंडलेले खानाचे सैनिक या शूरवीर स्त्रीयांनी यमसदनी धाडले. 

               यानंतर काहीच दिवसांत प्रसिद्ध शिवराय-अफजल खान भेट झाली. जावळीच्या खोऱ्यात छत्रपतींनी बत्तीस दातांचा बोकड फाडला. त्यानंतर मावळ्यांनी खानाचे सैनिक कापायला सुरुवात केली. घाबरलेले खानाचे सैनिक चारी दिशांना जीव मुठीत धरून पळू लागले. वाई परगण्याच्या प्रत्येक देशमुख, पाटील आणि इनामदाराने दिसेल तो खानसैनिक कापायला सुरुवात केली. भुईंजकरही यात मागे नव्हते.
  
         अशा पराक्रमी घराण्यात सोयरीक करण्याचा मोह दस्तुरखुद्द छत्रपतींनाही आवरला नसावा म्हणूनच त्यांनी आपली कन्या राणूबाई आक्कासाहेब यांना जाधवरावांची सून करत भुईंजला धाडले.

#भुईंज
#रणमस्तबहाद्दर
#शिवप्रताप

Comments

  1. Jay Bhavani.. जाधवराव घराण्यातील रणरागिणी ना मानाचा मुजरा.. त्यांचा शौर्याला ल सलाम. 🚩🙏💪⚔️

    ReplyDelete
  2. जय भवानी
    जय शिवाजी
    जय संभाजी

    ReplyDelete
  3. जाधवराव घराण्यातील रणरागिणी ना मानाचा मुजरा.. त्यांचा शौर्याला ल सलाम. 🚩

    ReplyDelete
  4. रगरागिणींना त्रिवार मुजरा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता