संजीवनगुप्तहेर..


संजीवनगुप्तहेर..


एक कथा घेऊन येतोय, पहिल्या गुप्तहेराची.. त्याच्या प्रेमाची.. प्रतिशोधाची.. असीमीत त्यागाची.. चातुर्याची आणि बलिदानाची..
              गुप्तहेर हा शब्द ऐकताच "बहिर्जी नाईक" हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि आचार्य चाणक्य या दोघांनी गुप्तहेरांचा पुरेपूर वापर करत त्यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळातही भारताची रॉ, पाकिस्तानची आयएसआय, इस्राईलची मोसाद अशा गुप्तहेर संघटना रात्रंदिवस कार्यरत असतात. संरक्षण क्षेत्रातील त्यांचे महत्व नव्याने सांगायला नको.
              पण पुराणांमध्येही आपल्याला एका गुप्तहेराची कथा आढळते. आजच्या सारखीच प्रेम, प्रतिशोध, धारिष्ट्य आणि उत्सुकतेने भरलेली... महाभारत, मस्त्य पुराण आणि अग्नीपुराणात या कथेचा उल्लेख येतो. त्यामुळेच कदाचित या कथेच्या नायकाला 'पहिला गुप्तहेर' म्हणून ओळखले जात असावे.
              कथेचा पहिला भाग आज रात्री ८ वाजता आपल्या समोर येईल.. कथा कशी वाटली हे अवश्य कळवा.. काही सुधारणा असेल तर अवश्य सुचवा..

#रणमस्तबहाद्दर

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता