संजीवन गुप्तहेर ०८
संजीवन गुप्तहेर
०८
"अनेक देवतांच्या मनात असणारे महत्कार्य आज तुझ्याकडून घडले आहे. राक्षसगुरुंच्या मृत्यूने सहजपणे राक्षसांचे समुळ उच्चाटन होईल यात दुमत नाही. तुझे मनोरथ देखील पुर्ण झाले आहे. तेव्हा आता उठ आणि चल येथून..." असे विचार त्याच्या मनात येत असताना समोर दिव्याच्या मंद प्रकाशात पर्णकुटीतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह त्याला अगदीच निष्काम भासत होता. त्या मृतदेहाच्या मुखकमलावरचे स्मितहास्य मिणमिणत्या प्रकाशातही तेजोमय भासत होते. ते दृष्य पाहून कच मधील शिष्य आता जागा झाला. "शुक्राचार्य फक्त तुझे गुरुच नाहीत तर त्यांनी तुला दोन वेळा पुनःरोज्जीवित केले आहे. आज तुझ्यासाठी ते बलिदान द्यायलाही तयार झाले. त्यांनी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला. शत्रुचा पुत्र आहेस हे माहित असूनही तुझ्यासोबत दुजाभाव केला नाही." असा त्याच्या आतील शिष्य त्याला ठणकावून सांगत होता. शेवटी अंतरीचा शिष्य वरचढ ठरला आणि कचने शुक्राचार्यांना पुनः जिवंत करण्याचा निर्णय घेतला.
पर्णकुटीची कवाडं उघडून कच बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ आपली भरभक्कम पाऊलं टाकत आचार्य देखील बाहेर आले. संजीवनी विद्येचा पहिलाच प्रयोग कचने यशस्वी रित्या पार पडला होता. समोरच्या वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेली देवयानी एकटक पर्णकुटीकडेच नजर टिकवून होती. त्या दोघांनाही समोर पाहून देवयानीची कळी पुन्हा खुलली. आनंदाने तीने आपल्या पित्यास आलिंगन दिले. कचकडे पाहून ती मंद हसली, कचनेही पापण्या लवून तिचे आभार मानले. ती रात्र आज पहिल्यांदाच कचची वैरीण नाही तर सहचारिणी झाली होती. आश्रमातील गेल्या अनेक वर्षांतील हि पहिली रात्र अशी होती जी कचला कवेत घेणार होती. पौर्णिमेचा शुभ्र चंद्रमा चकोर पक्षाप्रमाणे निश्चल डोळ्यांतून तो आज पिऊ पाहत होता. इतका आनंद कचला आजवर कधीही झाला नव्हता.
जपमालेतील रुद्राक्ष अंगठ्याने मागे सारावा तसे दिवस सरत होते. कचचे शिक्षण पुर्ण झाले आणि तो स्वगृही परत जाण्यासाठी गुरुदेवांच्या आज्ञेची वाट पाहू लागला. आणि तो दिवस उजाडला.. सकाळी सुर्यदेवांची आराधना करून कच अखेरचा निरोप घेण्यासाठी शुक्राचार्यांच्या कुटीमध्ये गेला. त्याच्या कुरळ्या केसांवरुन हात फिरवत आचार्य बोलू लागले "मी दिलेल्या कोणत्याही विद्येचा तु गैरवापर करणार नाहीस याचा विश्वास आहे. पण कच.. तुला अनुभुतीही नसेल इतकी शक्तीशाली विद्या तुझ्या जवळ आहे, ती म्हणजे.. संजिवनी विद्या ! महादेव, मी आणि आता तू असे या चराचरातील फक्त तीनच व्यक्ती या विद्येचे जाणकार आहेत. आजवर मी आणि महादेवांनी या विद्येचा प्रयोग करताना अनेक नियमबंधांचे काटेकोर पालन केले. तसेच तु देखील करावे हिच अपेक्षा.." "आचार्य आपला प्रत्येक आदेश मला शिरसावंद्य आहे.." असे म्हणत कच हात जोडून उभा राहिला. कचला निरोप देण्यासाठी संपूर्ण आश्रम आचार्यांच्या कुटीबाहेर जमला होता. पण कचची नजर दुसरेच काही शोधत होती. जसं जसा कच आश्रमाच्या बाहेर पाऊल टाकत होता तसा तो आणखीच अस्वस्थ होत होता.
डोळ्यांत तरळलेले अश्रु आवंढ्यासोबत गिळत आपली जड पाऊले तो आश्रमाबाहेर टाकू लागला. कदाचित हि भेट अधूरीच रहावी अशी नियतीची इच्छा असेल. कच अजूनही मागे वळून पाहत होता. पण तो शोधत असलेले ते दृश्य अजूनही त्याच्या नजरेस पडले नव्हते. तेवढ्यात वसंतमुखीचा सुगंध त्याला खुणावू लागला. "इथे वसंतमुखी ?" कच जरा गोंधळला आणि अचानक त्याच्या लक्षात आले.. देवयानी..! कच भिरभिरत्या नजरेने संपूर्ण अरण्यात दृष्टीक्षेप टाकू लागला. झाडाआडून चालत देवयानी त्याच्या पुढे आली. हातात वसंतमुखीच्या पुष्पांचा गुच्छ घेऊन समोर उभी राहिलेली देवयानी एखाद्या इंद्रदरबारातील अप्सरेलाही लाजवेल इतकी सुंदर दिसत होती. आपल्या हातातील गुच्छ तीने कच समोर धरला पण तो काही वेळापूर्वीच तिच्या सौंदर्यदर्शनात आपली सुद हरवून बसला होता. त्या दोघांची पहिली नजरभेट कचला आठवू लागली.
आपल्या हातातील गुच्छ त्याच्या खांद्यावर अलगद मारत "मला न विचारताच जाणार होतात काय कचदेव ?" असे लाडीकपणे विचारु लागली. तिच्या प्रहारासोबत कच भानावर आला आणि त्याला जाणवले की तिच्या निळशार डोळ्यांमधील सागर पुर्णतः आटला आहे. काल रात्रभर तीने गाळलेले अश्रु तिच्या कोरड्या डोळयात त्याला दिसू लागले. "मला तुला काहीतरी सांगायचं आहे कच.. खरं तर तुच सांगशिल असे वाटले होते पण.. पण.." देवयानी अडखळत होती. एक दिर्घ श्वास घेऊन ती एकदमच बोलली "कच मी तुझ्यावर प्रेम करते..!" मघापासून आडवलेला हुंदका अनाहुतपणे कचच्या तोंडून बाहेर पडला. आपल्या दोन्ही गुढघ्यांवर बसत तो एका लहान मुलासारखा रडत होता. त्याला असे रडताना पाहून देवयानी देखील अचंबित झाली. "देवयानी मला माफ कर !" असा आर्जव कच करु लागला. पण काय घडतंय हे तिला कळेनासे झाले. "तु आधी शांत हो कच ! काय झालंय नक्की ?"
"देवयानी मी तुझ्या प्रेमाच्या योग्यतेचा नाही. किंबहुना मी कोणाच्याही प्रेमाच्या योग्यतेचा नाही." कच हुंदके देत आपले अस्पष्ट शब्द पूर्ण करत होता. "देवयानी.. या आश्रमात मी एक हेतू घेऊन आलो होतो. आणि तू फक्त मला त्या हेतूपर्यंत पोहचवणारा मार्ग होतीस.." "काय ? बाबांचे शिष्यत्व.. माझे प्रेम.. हे सर्व तू रचलेलं कुंभाड होतं ?" देवयानीच्या पायाखालीची जमीन सरकली. "होय देवयानी.. हिच योजना आखली होती माझ्या वडिलांनी.. तुझ्या प्रेमाचा उपयोग करुन संजीवनी विद्या प्राप्त करणे हेच माझे अंतिम ध्येय होते. मला माफ कर" कच हात जोडून विनवणी करत होता. देवयानीला अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता "कच माझ्यासोबत, माझ्या प्रेमासोबत, तुझ्या गुरु सोबत असा अधर्म करताना तुला काहिच कसे वाटले नाही..? तु कधीच माझ्यावर खरं प्रेम केलं नाहीस..?"
"देवयानी माझा एकच धर्म होता संजीवनी विद्या ! आणि तो मी निभावला. एका गुप्तहेराला त्याच्या इप्सित ध्येयाव्यतीरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे बंधन नसते. मी तुझ्याकडे आकर्षित झालो पण.. पण.. तू माझ्या गुरुची कन्या आहेस अर्थात माझ्या बहिणीसारखी आहेस" काळजावर दगड ठेवून कच तीला समजवण्याचा प्रयत्न करत होता. "चांडाळा.. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवताना या गोष्टी तुला ज्ञात नव्हत्या का ?" देवयानी लालबुंद झाली होती. कच फक्त 'मला माफ कर !' एवढंच म्हणत होता. देवयानी ताडकन उठली आणि काळ्याभोर आकाशात दामिनी कडकडावी तशी गरजली "कच..! तु गुरु शिष्याचे नाते पायदळी तुडवत खूप मोठा छळ केला आहेस.. एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात कोमल क्षणांचा असा निर्दयी अपमान केला आहेस.."
तिचे ते विक्राळ रूप पाहून कच घाबरला. "देवयानी मी फक्त पितृआज्ञा आणि माझ्या धर्माचे पालन केले आहे" पण देवयानी आता काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. "कच.. तू प्रेमाच्या पवित्र बंधनाला कलंकित केले आहेस.. मी तुला श्राप देते ज्या इप्सितासाठी तु हा भावनांचा उच्छाद मांडलास ती संजीवनी विद्या तुझी कधीच होणार नाही.. तु कधीच या विद्येचा सफल प्रयोग करु शकणार नाहीस..!" देवयानीचे हे शब्द वज्राघाताप्रमाणे कच वर बरसत होते. कच खिन्नपणे सर्व ऐकून घेत होता. देवयानी आपले आश्रु पुसत निघून गेली. कच देखील उत्तरेकडे मार्गक्रमण करु लागला.
काहीच दिवसांनी देव आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध झाले. असंख्य देव मृत्यूमुखी पडले. कच आपल्या पर्णकुटीत मृतदेहांवर संजीवनी विद्येचा प्रयोग करत होता. पण दुर्दैवाने तो विफल ठरत होता. देवयानीची शापवाणी खरी ठरली होती...
आपले प्रेम, निष्ठा, जीवन आणि धर्म असे सर्वकाही पणाला लावणारा हा पुराणांतील पहिला गुप्तहेर..! संजीवनी विद्येचा ज्ञाता संजीवन गुप्तहेर..! खरं तर या पात्रांचा आणि घटनाक्रमांचा इथे अंत होत नाही. हि नांदी होती सर्वच गोष्टींची.. पुढे देवयानीचा विवाह राजा ययाती सोबत होतो ज्यांचा पुत्र यदु यदुवंशाची स्थापना करतो. तर साहसी गोष्टी या फक्त सफल वीरांच्याच नसतात हे दाखवून देत कच नवा पाया घालतो. देव आणि राक्षस संग्रामाची दिशा बदलणारी, देवतांना देवत्व आणि अमरत्व प्राप्त करुन देणारी घटना कचच्या या कथेतून जन्म घेते..
आणि ती घटना म्हणजे..
समुद्रमंथन...!

समाप्त 🙏
रणमस्तबहाद्दर
रणमस्तबहाद्दर
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
सुरुवाती पासून वाचण्यासाठी :
https://swapnsutra.blogspot.com/?m=1
https://swapnsutra.blogspot.com/?m=1

Comments
Post a Comment