वडा पाव

 वडा पाव

महाराष्ट्राचं हक्काचं 'स्ट्रीट फूड' 


स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्याकडेच्या गाड्यावरील झटपट खाण्याचे पदार्थ.. मुळात महाराष्ट्राला ही संकल्पना फारच नवीन आहे. आज आपण जे रस्त्यावरील पदार्थ खातो ते बहुतांशी बिहारी, पंजाबी आणि उडपी आहेत. पण त्यातही सर्वांना आवडणारा आणि परवडणारा 'आपला' असा महाराष्ट्राचा वडापाव स्वतःची खासियत राखून आहे..



             १६ व्या शतकात बटाटा पोर्तुगीजांसोबत भारताच्या दक्षिणी किनाऱ्यावर आला. मुळात बटाटा मुळचा दक्षिण अमेरिकेतील 'पेरु' या देशाची उपज तेथून इ.स. १५८७ मध्ये स्पॅनिश लोकांनी तो युरोपात आणला तिथे त्याचे 'कमाटा' हे नाव बदलून पोर्तुगाली 'बटाटा' हे नाव रुढ झाले. महाराष्ट्रात आजही बटाटा त्याच्या मुळ पोर्तुगीज नावानेच ओळखला जातो. पण गेल्या चारशे वर्षांत बटाटा भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत असा काय मिसळला की आज त्याला भारतीयांच्या जिभेपासून दूर करणं निव्वळ अशक्य आहे..



               पोर्तुगीजांची दुसरी देण म्हणजे 'पाव', (ब्रेड).. एकेकाळी पोर्तुगीज आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांसाठी पाव हे फार मोठे प्रभावशाली शस्त्र होते.. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत सार्वजनिक पाणवठ्यात आणि विहिरींमध्ये एखादा पावाचा तुकडा टाकायचा आणि ते पाणी पिलं तर तुमचा धर्म बुडाला अशी भिती पोर्तुगीज मिशनरींनी सर्वत्र पसरवली होती. अनेक शतके ही शक्कल लढवून गोवा परीसरात पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर हिंदूंची धर्मांतरे घडवून आणली. 



पण मग हिंदूंचे धर्मपरिवर्तन करणारा पाव आणि पोर्तुगीजांचा बटाटा महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनून जगभर 'द इंडियन बर्गर' म्हणून नावारुपाला कसा आला ? 


१९ व्या शतकात भारतात इंग्रजांची सत्ता कायम झाली होती. हळूहळू इंग्रजी आदबो-तहजीब आणि खाद्यसंस्कृती लोक आत्मसात करु लागले. तेव्हाच पाव देखील इंग्रजी डिश मधून भारतीय ताटात येऊ लागला. २० व्या शतकात मुंबईचा व्यापार आणि वेग कमालीचा वाढला. पोर्ट, गोदी आणि सूतगिरणींमध्ये काम करणाऱ्या ऐतद्देशीय गरीब कामगारांची पोटभर आणि झटपट अन्नाची गरज भागविण्यासाठीच वडापावने अवतार धारण केला..

                  काहींच्या मते उडपी हॉटेलवाल्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मराठी लोकांना केलेल्या आह्वानाला प्रतिसाद देत अशोक वैद्य यांनी दादर स्टेशन बाहेर वडा, पोहे आणि ऑमलेट पावची गाडी सुरु केली. १९६८ मध्ये एकेदिवशी एका गिऱ्हाईकाच्या मागणीवरून त्यांनी पावात वडा घालून देऊ केला.. ते काँबिनेशन त्याला तर आवडलेच पण इतरांनाही हळूहळू आवडू लागले. बघता बघता वडापाव मुंबईच्या कष्टकऱ्यांचं स्टेपल डाएट (मुख्य आहार) बनला. पुढे गिरणी बंद झाल्यावर मराठी लोकांनी ठाकरेंच्या नेतृत्वात शिववडापाव नावाने वडापावचे गाडे चालवले. 

                  आजच्या घडीला वडापाव महाराष्ट्राची ओळख बनून जगभर लोकांची भुक भागवतोय. महाराष्ट्रात तर प्रत्येक गावात स्वत:ची वेगळी खासियत असणारा वडापावचा एखादा गाडा हा असतोच..!


तुमच्या आवडीचा वडापाव आणि त्याचं वैशिष्ट्य कमेंट मध्ये नक्की सांगा..


#रणमस्तबहाद्दर

                                        ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.





Comments

  1. How to make money on soccer bets - Work Tomakemoney
    As a general หาเงินออนไลน์ rule of thumb, the 순천 출장샵 more money you spend on soccer, the bigger your 남원 출장안마 bet is. 강릉 출장안마 A soccer bet is when you place a wager on your 세종특별자치 출장마사지 first team to win,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता