Posts

भृगुऋषींची आरती

भृगुऋषींची आरती‌ श्री क्षेत्र भुईंज त्रिभुवनी पावन | समाधिस्थ भृगूऋषी तिथे संजिवन || चंद्रिका-कृष्णा संगमी इंदू वळण | तेथे त्वा केलेसी अजरामर स्थान ||१|| जय देव जय देव, जय ऋषी महर्षी भृगुऋषी राजा | आरती ओवाळू सायुज्य द्विजा || धृ.|| जय देव जय देव  कल्पारंभी जेव्हा ब्रह्म गडबडला | सप्तर्षी प्रजापती भार्गव निर्मिला || मंदाकिनी स्थापूनी निश्चिंत केला | लत्थाघाते विष्णू चरणी लागला ||२|| जय देव जय देव,  वेद स्मृती शास्त्र पुराणे रचली | अवनीवरती आद्य अग्नी चेतविली || दर्शनमात्रे नवग्रह पिडा हरली | नारायण आण्णांनी समाधी उद्धरली ||३|| जय देव जय देव, गाणपत्य शैवा वैष्णव आधारा | देव मानव राक्षस चराचर उद्धारा || महालक्ष्मी तिष्ठली पाठी निर्धारा | भक्तगण स्वप्नील मुक्तीपथी तारा ||४|| जय देव जय देव, अर्थ  तिन्ही लोकात पवित्र समजले जाणारे भुईंज नावाचे एक तिर्थक्षेत्र आहे. तिथे आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी संजीवन समाधी घेऊन आजही नित्यनेमाने तप करत आहेत. (स्कंदपुराण) चंद्रिका आणि कृष्णेच्या संगमी संपूर्ण विष्णू रुप असलेली कृष्णा नदी परम् पवित्र असे चंद्राकार वळण घेते‌. तेच स्थान तुम्ही (भृगुऋषी...

आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज

Image
 आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज  आणि कृष्णा-वेण्णा-कोयनादी पंचगंगा उत्पत्ती..  गणपती हे निराकार परब्रह्माचे साकार स्वरुप असून याच ॐकार गणपतीपासून ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आणि संपूर्ण चराचर सृष्टी उत्पन्न झाली अशी धारणा असणाऱ्या व श्री महागणपतीची उपासना करणाऱ्या उपासकांना ‘गाणपत्य’ म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मातील पाच प्रमुख संप्रदायांपैकी गाणपत्य हा एक आहे. याच गाणपत्य संप्रदायांचा आद्य ग्रंथ समजला जाणाऱ्या ‘श्री गणेश महापुराणाची’ रचना आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी महाराजांनी केली.  हे गणेश महापुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला स्फुरले त्यांनी ते वेदव्यासांना सांगितले. व्यासांनी त्याचा उपदेश भृगुऋषींना केला आणि पुर्वजन्मव्याधिने ग्रस्त सौराष्ट्राचा राजा सोमकांताला उपदेश करताना महर्षी भृगू यांच्या संवादातून श्री गणेश महापुराणाची रचना झाली.  आचार्य श्रेष्ठ भृगुऋषी महाराज                  गणेश पुराणाच्या सुरुवातीच्या आध्यायांमध्ये जी कथा येते ती याप्रमाणे - सौराष्ट्रातील देवनगरचा राजा सोमकांत पुर्वजन्म कर्माने व्याधीत ...

महाशैव पाशुपत भृगुऋषी

Image
 महाशैव पाशुपत भृगुऋषी  दक्ष यज्ञात सतीने अग्नीसमर्पण केले ही कथा आपण जाणतोच.. पण याच कथेतून भृगुऋषींचाही शिव उपासक होण्याचा मार्ग सुरु होतो‌. श्री मुद्गल पुराणातील दुसऱ्या खंडात ४८ व्या "भृगुचरितम्" नामक अध्यायात यासंबंधीची जी कथा येते ती पुढीलप्रमाणे.. भृगुऋषींचे पिताश्री ब्रह्मदेव हे या सृष्टीचे निर्माते म्हणून सावित्री (गौतमी) नदीकाठी झालेल्या ऋषीसभेत भृगुऋषींनी चराचराला जन्म देणाऱ्या जगत् पिता ब्रह्माला सर्वश्रेष्ठ ईश्वर मानले होते. पण पुढे त्रिदेवांची परीक्षा घेऊन त्यांनीच गुणातीत नारायण हा सर्वश्रेष्ठ आहे असा निकाल दिला होता. विष्णुंची महत्ता लक्षात आल्याने भृगुंनी वैष्णव मार्ग स्विकारुन भुईंज क्षेत्री पापक्षालन तप केले. इथे विष्णू त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वैष्णवमार्गी जिवन व्यतीत करण्यास सुरुवात केली.                प्रजापती दक्ष यांची एक कन्या ख्याती ही प्रजापती भृगुऋषींची पत्नी होती तर दुसरी कन्या सती ही महादेवांची पत्नी होती. भृगुऋषी आणि महादेव हे नात्याने साडूबंधू होते. दक्ष प्रजापतीने एका महायज्ञाचे आयोजन करुन विष...

श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज

Image
 श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज आज गंगा दशहरा निमित्त भृगुभुमीतील श्रीविष्णुरुपिणी कृष्णामाईच्या काठावरील विस्मृतीत गेलेल्या चंद्रेश्वर महादेवाची ओळख करून घेऊ..  सिद्धेश्वर-चंद्रेश्वर महादेव, भुईंज आपल्या सर्वांना एक गणेशकथा माहिती आहेच, स्कंदपुराणात पंधराव्या अध्यायात ही कथा देवर्षी नारदमुनी ऋषीगणांना सांगतात. ज्यात आपल्या पिटुकल्या मुषक वाहनावरुन कैलासी जात असता महाकाय बाल गणेशाचा तोल जाऊन तो ढासळतो. त्याला पाहून आकाशातील चंद्र हसतो आणि गणपतीला राग येतो. आपल्या स्वरुपाचा गर्व असलेला चंद्रमा गणपतीच्या बेढब शरीरावरुन त्याला चिडवतो अशी काही ठिकाणी माहिती मिळते. चिडलेला गणपती " येत्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तू या जगातून अदृश्य होशील, निष्प्रभ होशील. शुद्ध चतुर्थीला (विनायकी चतुर्थी) जो कुणी तुला पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल " असा श्राप देतो.                  चंद्र शापित झाला हे पाहून ब्रह्मदेव तिथे येतात आणि कैलासावर जाऊन गजाननाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात.  आदिमूर्ति गजानना ॥ ब्रह्मा विष्णु शिवकारणा ॥  मंगलधामा सनातन...

भुईंजचा अज्ञात पानिपतवीर

Image
भुईंजचा अज्ञात पानिपतवीर ‘मर के भी जो न हटा वो - मरहट्टा’ हे ब्रीदवाक्य सार्थ करणारा मराठी अस्मितेचा सर्वात मोठा लढा म्हणजे पानिपत.. भारताचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मराठ्यांनी कोसो दूर जाऊन आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. ' लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. ' अशा या महाप्रचंड पानिपत शौर्ययज्ञात भुईंजच्या वीरभुमीने आपली समिधा अर्पण केली नसती तरच नवल..! ती समिधा होती.. ‘राजश्री हैबतराव जाधव भुईंजकर’ प्रतिकात्मक चित्र          ‌      पानिपतचा पत्रव्यवहार वाचत असताना 20-10-1760 रोजीचे एक पत्र हाती लागले. मराठ्यांनी उत्तरेत कुंजपुऱ्यापर्यंत मजल मारली होती. सैन्याला दिवसेंदिवस रसद कमी पडत होती, उत्तरेतील ठिकाणेदार आणि मांडलिक कोणतीही करभरणी करत नव्हते यातच पुण्यास पाठवलेल्या पत्रांनाही प्रतिउत्तर मिळत नव्हते. अशावेळी कुंजपुऱ्यावर विजय मिळवल्यानंतर तेथील वृत्तान्त नानासाहेबास कळवताना राजश्री बाळकृष्णपंत यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे..    ...

आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज

Image
आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज मी भुईंज मध्ये जन्मलो, या गावाला नावच मुळात ज्या व्यक्तीमुळे पडले ते आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज यांच्याबद्दल कायमच मनात एक उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून शोध घेताना अनेक नवनवीन गोष्टी माझ्या समोर येत त्याच आज वाचकांसमोर मांडत आहे. भुईंज येथील आचार्य भृगुऋषींची समाधी भृगुऋषींचे मुळ स्थान फारस (इराण) समजले जाते. हिंदू मान्यतेनुसार साधारणतः इ.स. पूर्व साडेचार हजार ते सात हजार वर्षांपूर्वी भृगूंचा जन्म झाला असावा. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे  "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज."  ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा  "भृगू संहिता"  हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आह...

रामदासी आणि सातारचे छत्रपती

Image
 रामदासी आणि सातारचे छत्रपती समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते या वादात आपल्याला पडायचे नाही. कोणताही इतिहासकार समर्थांच्या गुरु असण्याला दुजोरा देत नाही. तथापि रामदासी संप्रदाय हा आजचा आपला विषय आहे. साधारणतः छत्रपती थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात रामदासी संप्रदायाचे प्रस्थ बरेच वाढले होते. राजवाड्यासह साधारणतः साताऱ्यातील प्रत्येक सरदाराच्या वाड्यातील देवघरात ' श्रीराम ' रामदास स्वामी आणि कल्यान स्वामींच्या मार्फत विराजमान झाले. चाफळ हे या संप्रदायाचे प्रमुख स्थान. इथून समर्थांची गादी गुरुशिष्य परंपरेने चालत असे. आजच्या घडीला सातारकर छत्रपतींसाठी श्रीराम आणि समर्थ रामदास हे वंदनीय आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्याच्या त्यांच्या अनेक पत्र व पत्रिकांची सुरुवात ' श्री सद्गुरु समर्थ प्रसन्न ' या घोषवाक्याने होत असते. (पुढे देणार असलेली घटनाच छत्रपतींच्या या रामदासी प्रेमाचे कारण असावे असा अंदाज बांधता येतो.)  फोटो : छत्रपती महाराज शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबाराजे यांच्या लग्नपत्रिकेचा मायना, ज्यात श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न असा उल्लेख आहे.  ...