छत्रपती गादी
छत्रपती गादी भाग ४ (अंतिम) इकडे सातारच्या दोन्ही छत्रपतींना १८५७ च्या उठावात सहभागी असल्याने कराची व अहमदनगर येथे नजरकैदेत ठेवले होते. पैकी छत्रपती प्रतापसिंहा चे दत्तकपुत्र तिसरे शाहू उर्फ जंगली महाराजां ना जुलै १८५८ ला सोडण्यात आले. पुढे ते पुणे येथे भवानी पेठेत राहू लागले तिथेच १ जून १८९२ रोजी त्यांचे निधन झाले. तर छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांचे दत्तकपुत्र छत्रपती व्यंकोजीराजे हे देखील कैदेतून सुटून साताऱ्यात आले. व्यंकोजीराजे हे शिवरायांचे चुलते शरीफजीराजे यांच्या वंशातील असले तरी ते सामान्य कुटुंबातील म्हणून तत्कालीन रेसिडेन्ट फ्रेयर याने आक्षेप घेतला होता, त्यामुळे छ. आप्पासाहेबांनी त्यांच्या कुटुंबास १८४३ मध्ये ' राजाज्ञा ' पदवी बहाल केली होती. भूतपूर्व छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेबांच्या तिन्ही राणीसाहेब व इंग्रजांनी छत्रपती व्यंकोजीराजेंना छत्रपतींच्या सर्व संपत्ती, अधिकार व बिरुदावल्यांचे वारस म्हणून घोषित केले होते. (तथापि छत्रपतींची बहुतांश स्थावर मालमत्ता इंग्रजांनी जप्त करुन घेतली होती.) छत्रपती व्यंकोजीराजेंचे २३ डिसेंबर १८६४ रोजी निपु...