Posts

आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव.

Image
 महाराष्ट्राची अज्ञात वीरांगणा, आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव.  म्हाळसाबाईंची सर्वात सोपी ओळख म्हणजे आऊसाहेब जिजाऊंच्या आई किंवा लखुजीराजेंच्या पत्नी..! पण त्यांचं कर्तृत्व हे एवढ्यावरच सिमित होणारं नाही आहे.               म्हाळसाबाई या ‘वणंगपाळ बारा वजीरांचा काळ अशी’ ख्याती असणाऱ्या फलटणच्या वणगोजी नाईक निंबाळकर यांच्या बहिण होत्या. त्यांचे माहेरचे नाव गिरजाबाई असावे असा अंदाज इतिहास अभ्यासक मांडतात. लखुजीरावांच्या आई ठाकराईराणी देखील याच घराण्यातील होत्या त्यांच्याच मध्यस्थीने लखुजी-म्हाळसा संबंध झाला असावा. या उभयतांना चार पुत्र व जिजाऊ हि कन्या झाली.  याव्यतिरिक्त लखुजीराजेंचे यमुनाबाई व भागिरथीबाई असे आणखी दोन संबंध झाले.                   म्हाळसाऊंचे पती लखुजीराजे त्याकाळचे दख्खनेतील सर्वात मोठे सरदार होते. सुरुवातीच्या काळातच लखुजीनी स्वपराक्रमाने सिंदखेडच्या देशमुखीसह २७ महाल आणि ५२ चावड्यांची देशमुखी जहागिरी आपल्या नावे वंशपरंपरागत करुन घेतली. तर पुर्वपार असणारी पंचहजारी ...

कौलं..

Image
  खरंतर हि कौलं फार उपयुक्त..! उन्हाळ्याच्या दिवसांत पत्र्यामध्ये जाणवणारी धग या कौलात कधीच जाणवत नाही, तर हिवाळ्याच्या रात्रींमध्ये हि कौलं घराला उबदारपणा देतात. आमच्या वाड्याच्या बहुतांश भागात काळी खापरी कौलं होती तर नव्याने बांधलेल्या एका खोलीवर बँगलोरी कौलं होतं.. बँगलोरी कौलं खापरी कौलांपेक्षा जास्त मजबूत व आकर्षक असल्याने नंतर सर्वत्र त्यांचीच मागणी जास्त वाढत गेली. लहानपणी मुख्य गावातील बहुतांश घरं आणि वाड्यांवर हि काळी किंवा लाल कौलंच आपली सावली धरुन असायची.‌.! येवढच काय तर या खापरी कौलांवर भाजून केले जाणारे कितीतरी पदार्थ त्याकाळी प्रसिद्ध होते..                          पावसाळ्याच्या सुरुवातीला कुंभाराचा एक व्यक्ती न चूकता येवून उन्हाळ्यात माकडांनी केलेला उच्छाद निस्तरुन घर शेकरुन जायचा.. अशा व्यक्ती प्रत्येक गावात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असायच्या, कारण हे काम फारच कलात्मकतेने संथपणे आणि संयमाने करायची गरज असायची. त्या कुंभाराचं घर जवळच असल तरी त्या दिवशीचा त्याचा चहा नाष्टा ते जेवण सगळंच ...

पापविनाशक भृगुतीर्थ

Image
 भुईंज (ता.वाई जि.सातारा) च्या सौंदर्याचा गाभा म्हणजे कृष्णामाईचा घाट..! याच घाटावरील बुरुजावर हि मुर्ती कितीतरी काळापासून दुर्लक्षित आहे. खरंतर भुईंज या परिसराला फार मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पण तरीही भुईंजचा धार्मिक इतिहास हा भृगुऋषी या नावापासून सुरु होऊन शेवटी भृगुऋषी याच नावाजवळच येऊन थांबतो...                    गरुड आणि मारुतीसह लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णू               हि मुर्ती आहे लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णुची..! समपाद अवस्थेत उभ्या असणाऱ्या चतुर्भुज मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख धारण केले असून खालच्या उजव्या हातात गदा (दंड) आणि डाव्या हाताने कटीवर बसलेल्या लक्ष्मीला सांभाळले आहे. या लक्ष्मी वल्लभाच्या उजव्या बाजूस गरुड तर डावीकडे हनुमान नमस्कार मुद्रेत उभे आहेत. विष्णु, गरुड आणि मारुतीने मुकुट परिधान केले असून लक्ष्मीच्या डोक्यावर मुकुट नाही तसेच कोणाच्याही गळ्यात व शरीरावर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. (किंवा कालौघात नष्ट झाले असावेत.) पण प...

क्षेत्र महाबळेश्वर

Image
 प्राचिन ते अर्वाचीन इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा जपणारे श्री क्षेत्र महाबळेश्वर...  क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वर या सर्वश्रुत पर्यटनस्थळातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते असेल तर ते क्षेत्र महाबळेश्वर (Old Mahableshawar).. इंग्रजांच्या सांस्कृतीक अतिक्रमणापासून अंतर राखून राहिलेले भारतीय इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण ! स्कंद पुराणातील सह्याद्री खंडावर आधारित ' श्री कृष्णामाई महात्म्य ' व ' महाबळेश्वर (स्थळ) महात्म्य ' या ग्रंथांमध्ये महाबळेश्वर क्षेत्राची व पंचगंगा मंदिराची माहिती मिळते.             'महाबळेश्वर' या स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. शिवरुप महाबळेश्वर, विष्णुरुप अतिबळेश्वर, ब्रह्मरुप कोटेश्वर अशी शिवालये एकमेकाशेजारी आहेत. या तिन्ही मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रात एकछत्री अंमल गाजवणारे देवगिरीचे सम्राट सिंघण देव (द्वितीय) यांनी इ.स. १२१५ मध्ये केली. पुढे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६२ मध्ये सोनोपंत डबीर यांचेकरवी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्णतुला करुन फार मोठा ...

श्रीमंत सरदार राजीराव जाधवराव भुईंजकर

Image
छत्रपती शाहूंचे विश्वासू सरदार श्रीमंत रा. रा. रायाजीराव राजे जाधवराव. मृत्यू : २५ फेब्रुवारी १७२८ भुईंजकर जाधवांची शाखा जिजाऊंचे वडील लखुजीराजेंच्या थोरल्या शाखांपैकी एक शाखा आहे. लखुजीराजेंचे थोरले पुत्र दत्ताजीराजे यांचे सुपुत्र राजे यशवंतराव हे आजोबा लखुजीराजेंसोबत देवगिरीच्या किल्ल्यावर निजामाशाहीकडून कपटाने मारले गेले. याच यशवंतरावांचे पुत्र लखुजीराजे दुसरे अर्थात लखमोजी राजे हे भुईंजकर जाधवराव घराण्याचे मुळ पुरुष..  श्रीमंत सरदार रा.रा. रायाजीरावराजे जाधवराव समाधीस्थळ भुईंज.             लखमोजींचे सुपुत्र खंडोजी यांचेकडे श्री राजाराम छत्रपतींच्या काळात सिंहगडाची किल्लेदारी होती. याच खंडोजींचे सुपुत्र राजे रायाजीराव हे श्री शाहू छत्रपतींच्या दरबारात मानाचे सरदार होते. रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले. ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची...

एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती‌...

Image
  एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती‌ ... एकाच नावाच्या दोन भावांबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का ? महाराष्ट्रावर एकाच वेळी दोन सख्ख्या चुलत भावांनी राज्य केले‌ आहे. निसर्गतः हे दोन्ही बंधु एकमेकांचे प्रबळ विरोधकही होते‌‌ हे वेगळं सांगायला नको.               आपल्या पुर्वजांची नावे येणाऱ्या पिढीला देण्याची परंपरा जगभरात फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे एकाच घराण्यात एकच नाव पुन्हा वापरल्याचे दिसून येते. पण एकाच पिढीत एकच नाव दोन भावांना दिल्याचे दुसरे कोणते उदाहरण ऐकिवात नाही. छत्रपती घराणेही या प्रथेस अपवाद नाही. पण एक नाव ज्याने एकाच वेळी दोन राज्यांची स्थापना केली ते नाव म्हणजे‌‌.‌‌...           "छत्रपती शिवाजी दुसरे" खरंतर या नावाची जादूच ही और आहे. स्वराज्याची स्थापना करणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे नाव आपल्या आपत्यास देण्याच मोह कुणाला होणार नाही. त्यातही हा मोह शिवरायांच्याच मुलांनाच झाला नसता तर आणखी नवल..        ...

गणपती

Image
  गणपती                 ' गणानाम् अधिपती इति गणपती | ' अशी संस्कृत व्याख्या असणाऱ्या गणपती या शब्दाचा मराठी अर्थ " गणांचा अधिपती " असा होतो. शिव आणि पार्वतीचा पुत्र अशी लोकप्रिय प्रतिमा असलेल्या या देवतेने हिंदू धर्मात इष्टपुजेचे स्थान मिळवले आहे. हिंदू धर्मातील त्याला मिळालेल्या आद्य पुजेच्या बहुमानावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते. पण मुर्तीशास्त्र आणि अभ्यासक यांच्या मते गणपती हि यक्ष देवता आहे. गणपतीचे मुळ स्वरुप हे 'विघ्नकर्ता' या रुपात असून काळानुरूप गाणपत्य संप्रदायाकडून त्याचे विघ्नहर्ता असे रुपांतरण केले गेले. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत ह्या गाणपत्य संप्रदायाचा अंतर्भाव होतो.  गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या हिंदूंच्या एका संप्रदायास ' गाणपत्य संप्रदाय ' ही संज्ञा असून ह्या संप्रदायाच्या अनुयायांना ‘ गाणपत्य ’ म्हणतात. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हा तरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. ह्याच कालखंडात रचलेल्या भवभूत...