Posts

आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज

Image
आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज मी भुईंज मध्ये जन्मलो, या गावाला नावच मुळात ज्या व्यक्तीमुळे पडले ते आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज यांच्याबद्दल कायमच मनात एक उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून शोध घेताना अनेक नवनवीन गोष्टी माझ्या समोर येत त्याच आज वाचकांसमोर मांडत आहे. भुईंज येथील आचार्य भृगुऋषींची समाधी भृगुऋषींचे मुळ स्थान फारस (इराण) समजले जाते. हिंदू मान्यतेनुसार साधारणतः इ.स. पूर्व साडेचार हजार ते सात हजार वर्षांपूर्वी भृगूंचा जन्म झाला असावा. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे  "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज."  ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा  "भृगू संहिता"  हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आह...

रामदासी आणि सातारचे छत्रपती

Image
 रामदासी आणि सातारचे छत्रपती समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते या वादात आपल्याला पडायचे नाही. कोणताही इतिहासकार समर्थांच्या गुरु असण्याला दुजोरा देत नाही. तथापि रामदासी संप्रदाय हा आजचा आपला विषय आहे. साधारणतः छत्रपती थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात रामदासी संप्रदायाचे प्रस्थ बरेच वाढले होते. राजवाड्यासह साधारणतः साताऱ्यातील प्रत्येक सरदाराच्या वाड्यातील देवघरात ' श्रीराम ' रामदास स्वामी आणि कल्यान स्वामींच्या मार्फत विराजमान झाले. चाफळ हे या संप्रदायाचे प्रमुख स्थान. इथून समर्थांची गादी गुरुशिष्य परंपरेने चालत असे. आजच्या घडीला सातारकर छत्रपतींसाठी श्रीराम आणि समर्थ रामदास हे वंदनीय आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्याच्या त्यांच्या अनेक पत्र व पत्रिकांची सुरुवात ' श्री सद्गुरु समर्थ प्रसन्न ' या घोषवाक्याने होत असते. (पुढे देणार असलेली घटनाच छत्रपतींच्या या रामदासी प्रेमाचे कारण असावे असा अंदाज बांधता येतो.)  फोटो : छत्रपती महाराज शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबाराजे यांच्या लग्नपत्रिकेचा मायना, ज्यात श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न असा उल्लेख आहे.  ...

पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती..

Image
 कुंपणच जेव्हा शेत खातं..  पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती.. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य मंदिरावर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी कळस चढवला. 'अहद् तंजावर तहद् पेशावर अवघा मुलुख आपला' म्हणत शाहू महाराजांनी आलम हिंदुस्थान आपल्या छत्राखाली घेतला.. शाहू छत्रपती निपुत्रिक असल्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात कोल्हापूरचे पदच्युत छत्रपती शिवाजी यांचे चिरंजीव व छत्रपती ताराबाईंचे नातू 'रामराजा' यांना दत्तक घेऊन गादीचे वारसदार बनवले.                 छत्रपती रामराजा यांचेसोबत पंतप्रधान बाळाजी बाजीराव भट उर्फ नानासाहेब याने 'सांगोला करार' केला. यान्वये छत्रपतींची सर्व सत्ता पुणेकरांच्या ताब्यात जाऊन छत्रपती नामधारी बनले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 'पगार' ठरवून देण्यात आला. याहूनही पुढे जाऊन शाहू छत्रपतींच्या काळात सातारा नगरीचे रहिवासी झालेले छत्रपती अजिंक्यतारा किल्ल्यावर 'नजरकैदेत' ठेवण्यात आले. छत्रपती रामराजांना वेडे ठरवून तर पुढे त्यांचे दत्तक पुत्र छत्रपती दुसरे शाहू हे दोघेही याच कैदेत ठार झाले. किल्ले ...

फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती..

Image
फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती..  राजवाड्यासमोरील गोल बागेत असणारी ही सदरची मुर्ती मला आधी छत्रपती थोरल्या शाहूंची वाटायची..  साताऱ्यात निवांत गादीवर बसून आयुष्य काढलेल्या व्यक्तीचा मृत्यूपश्चातही गादीवर निवांत बसलेलाच पुतळा बांधला हे बघून मित्रांमध्ये कुश्चीत हसायचो मी..  सातारा नुसती नावाला राजधानी छत्रपतींच्याने साध्या एका शहराचा विकास सुद्धा साधता आला नाही.. छत्रपती संभाजी हेच शेवटचे कर्तबगार छत्रपती त्यांच्यानंतरचे बाकीचे फक्त नामधारी.. इतर संस्थानिक बघा आणि आमचा सातारा बघा, आदबो-तहजीब तर सोडाच साध्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा यांच्याच्याने राखता आल्या नाहीत..  हळूहळू शाहू छत्रपतींचे कार्य समजले. पण बाकी वंशजांचं काय..‌? ते नावापुरतेच ना ? छत्रपतींची गादी का कुणालाच कर्तबगारीने चालवता आली नाही ? राजवाढ्यापुढे फक्त नावातच प्रताप असणाऱ्या या प्रतापसिंहांचा हा पुतळा का उभारला असेल ?  अशा भावना अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत मनात होत्या आणि मला विश्वास आहे की ९५% महाराष्ट्र आणि ९९% सातारकरांच्या याच भावना आहेत. पण सातारा गादीच्या स्थापने पुर्वीपासून आजपर्यंत...

वडा पाव

Image
  वडा पाव महाराष्ट्राचं हक्काचं 'स्ट्रीट फूड'  स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्याकडेच्या गाड्यावरील झटपट खाण्याचे पदार्थ.. मुळात महाराष्ट्राला ही संकल्पना फारच नवीन आहे. आज आपण जे रस्त्यावरील पदार्थ खातो ते बहुतांशी बिहारी, पंजाबी आणि उडपी आहेत. पण त्यातही सर्वांना आवडणारा आणि परवडणारा 'आपला' असा महाराष्ट्राचा वडापाव स्वतःची खासियत राखून आहे..              १६ व्या शतकात बटाटा पोर्तुगीजांसोबत भारताच्या दक्षिणी किनाऱ्यावर आला. मुळात बटाटा मुळचा दक्षिण अमेरिकेतील 'पेरु' या देशाची उपज तेथून इ.स. १५८७ मध्ये स्पॅनिश लोकांनी तो युरोपात आणला तिथे त्याचे 'कमाटा' हे नाव बदलून पोर्तुगाली 'बटाटा' हे नाव रुढ झाले. महाराष्ट्रात आजही बटाटा त्याच्या मुळ पोर्तुगीज नावानेच ओळखला जातो. पण गेल्या चारशे वर्षांत बटाटा भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत असा काय मिसळला की आज त्याला भारतीयांच्या जिभेपासून दूर करणं निव्वळ अशक्य आहे..                पोर्तुगीजांची दुसरी देण म्हणजे 'पाव', (ब्रेड).. एकेकाळी पोर्तुगीज आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांसा...

फारस आणि भारत

Image
  फारस आणि भारत टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला अशा एक ना अनेक प्रसिद्ध व्यक्तींमुळे ' पारसी ' समुदाय आज आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फारस (ईरान) आणि भारताचं नातं फार जुनं आणि घट्ट आहे.. भारताशी धार्मिक-सांस्कृतीक आणि दैवतांची देवाण घेवाण करणारा, हडप्पा काळात व्यापार करणारा, मराठीला शेकडोंची शब्दसंपदा देणारा, मुस्लिमांना संस्कृती आणि स्थापत्य देणारा हा फारस देश आपल्या भारताशी कधीही वेगळा न होण्याइतका घट्ट जोडला गेलाय.. आज पारसी नववर्षानिमित्त (फरवर्दिन) भारत आणि फारसच्या याच अतुट नात्याविषयी काहीसं.. आज ज्या लोकांना आपण पारसी समजतो साधारणतः ते सर्व जोरोस्ट्रिएन आहेत. ज़राथुस्ट्र (जारोस्टर) या धर्मोपदेशकाने इ.स.पुर्व पाचव्या शतकात स्थापन केलेला जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मापैकी हा एक आहे. हा धर्म त्याचे नाते इ.स.पुर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या मुळच्या पारशी संस्कृतीशी जोडतो. ही संस्कृती भारताच्या हिंदू संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी बहूईश्वरवादी होती. या दोन्ही संस्कृतींनी इतर गोष्टींसोबतच अनेक दैवते आणि दैवी कथांची देवाण घेवाण केली.     ...

सन १८३९ ची परदेशवारी..

Image
  सन १८३९ ची परदेशवारी.. आजही परदेशात जाणें अनेकांचे स्वप्न असले तरी परदेशवारी हि लोकांसाठी तितकी आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही, किंबहुना अनेकांसाठी तर ही नित्याचीच गोष्ट झाली आहे.                पण साधारणतः २०० वर्षांपूर्वी हि गोष्ट भारतीयांसाठी इतकी सोपी नव्हती. त्यात हिंदू लोकांमध्ये तर समुद्र ओलांडणे हे महापाप समजले जाई. विलायतेला गेलेला आणि तिथल्या सामान्य इंग्रज लोकांनी पाहिलेला पहिला हिंदू व्यक्ती हा मराठी होता आणि विशेष म्हणजे तो आपल्या सातारचा होता. यशवंतराव राजे शिर्के असे त्याचे नाव. सुदैवाने या यशवंतरावास 'स्मरण वही' (डायरी) लिहायची होती.                तसे याआधी रघुनाथराव पेशव्याने आरदाशिर फारशी आणि आबा काळे असे दोन वकील लंडनला पाठवले होते. पण त्यांचा अधिक तपशील मिळत नाही त्यामुळे यशवंतरावाने लिहिलेल्या स्मरण वहीच्या माध्यमातून हिंदू लोकांच्या पहिल्या विदेश वारीतील गमती जमती आणि नुकतेच आधुनिकीकरणाचे डोहाळे लागलेले इंग्लंड आज आ...