Posts

भार्गवराम परशुराम आणि परसबाळ

Image
भार्गवराम, परशूराम आणि परसबाळ ( #परशुराम #Parshuram ) भार्गव अर्थात महर्षी भृगू यांचे वंशज. आचार्य श्रेष्ठ भृगू आणि त्यांच्या वंशजांना अग्नीचे उपासक मानले जाते. आचार्य भृगुऋषी आणि त्यांच्या वंशजांनी आजच्या भडौच अर्थात खम्भातच्या खाडीवर राज्य केले, यामुळे हा परिसर भृगू-कच्छ या नावाने ओळखला जाऊ लागला. (ऋग्वेद 8-10-2-4 , तैत्तरेय संहिता 7-1-8-1, पंच ब्राह्मण 21-10-6, विष्णुधर्म 1-32 तसेच महाभारत अनु. 56) पुढे भडौचचा भूतपूर्व राजा शर्याती याची पुत्री "सुकन्या " हिचा विवाह भृगूपुत्र "महर्षी च्यवन " यांच्याशी लावून दिला गेला. यानंतर भार्गव वंशीय लोक संपूर्ण भारतभर विखूरले गेले आणि याच वंशात ऋषी जमदग्नी पोटी "राम" यांचा जन्म झाला. भार्गव (भृगू) वंशीय असल्याने भार्गवराम हे नाव त्याला प्राप्त झाले.                  ऋषी ऋचीक यांचे पुत्र ऋषी जमदग्नी आणि रेणू राजाची कन्या रेणूका यांच्या पोटी जन्म झालेल्या रामाने तपश्चर्येने भगवान शिवाकडून  एक परशू (कुऱ्हाड) प्राप्त केली आणि यावरुनच त्याला परश...

बाहुलीचं बालपण...

Image
बाहुलीचं बालपण... किती तरी वेळ उंबऱ्यावरच बसून मी एकटक रस्त्याकडे बघत होतो. ते निखळ आनंदी चेहरे अजूनही डोळ्यासमोर तसेच तरळत होते.            आमची रोजची सकाळच "वाड माऊशी..." या हाकेने होते. गावातील बेघर वस्तीतील पाच-दहा वर्षांची लहान मुलं हातात एक पिशवी आणि एक किटली घेऊन दररोज सकाळी पोटाची खळगी भरायला शिळं अन्न गोळा करत गावभर फिरतात. त्यांना उन, वारा, पाऊस काहीच बाधत नाही, टिचभर पोटाची भूकच त्यांना या सर्वांपासून वाचवत असेल कदाचित...               आमच्या मम्मीला या मुलांची फार ओढ. अगदी प्रत्येकाला ती त्याच्या नावानिशी ओळखते. दिवाळीचा फराळ असो की रक्षाबंधनाला त्यांना राख्या बांधणं, त्या मुलांसोबत कोणताही सण साजरा करताना तिचा उत्साह काही औरच असतो. गरमागरम चहा किंवा नुकतीच तव्यातून काढलेली चपाती समोर बसवून त्या मुलांना खायला लावणाऱ्या मम्मीचा अनेकदा आम्हा घरच्यांनाही राग येतो, कारण आमच्या आवडीची कोणतीतरी गोष्ट मम्मीने परस्परच त्यांना देऊन टाकलेली असते. पण यामुळेच त्या मुलांना देखील आमचं घर अगदी हक्काचं...

इंग्रजांकडून मराठ्यांसाठी वापरले जाणारे पर्यायी नाव "सवाजी !"

Image
सवाजी/सावजी (Savajee) सध्याच्या काळात सावजी हा शब्द ऐकताच आपल्या मनात चिकन किंवा मटणाचा विचार येतो. आपल्या झणझणीत मसालेदार स्वादाने नागपूरच्या सावजी चिकनने ही लोकप्रियता कमावली आहे. सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचा खत्री/सावजी हा एक भाग आहे आणि त्यांचीच हि प्रसिद्ध पाककला... छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, रायगड              पण सावजी या शब्दाची ३५० वर्षांपासून ते गेल्या १५० वर्षांपूर्वी पर्यंतची ओळख काही वेगळीच होती. शिवकाळानंतर इंग्रज मराठ्यांना " सावजी/सवाजी " या नावाने ओळखत असत. इस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारात आणि नोंदी (records) मध्ये स्वराज्याचा/मराठ्यांचा सावजी असा उल्लेख आढळतो. सातारा भोवती वेढा घातलेल्या मुघलांची मराठ्यांनी केलेल्या लूटीसंदर्भात २ मार्च १७०० रोजी मुंबई वरुन सुरतला गेलेल्या कंपनीच्या पत्रात "The muguls sitting down before Sitora (Satara), and of the Savajees robbing and plundering all about him" [Factory Record's, Bombay Vol.17] मराठ्यांचा सवाजी असा उल्लेख आला आहे.             ...

धावजी पाटील, सुरुर

Image
काळुबाईचे बंधू, पट्टशिष्य आणि महाराष्ट्रातील अघोरी विद्येचे केंद्र... श्री धावजी पाटील मंदिर, सुरुर धावजी पाटील दरबार मंदिर सुरुर ता.वाई (सातारा) महाराष्ट्रात धावजी पाटील माहिती नसणारा काळुबाईचा उपासक सापडणे  दुर्मिळ आहे. काळुबाईचे बंधू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धावजी पाटलांचा इतिहास देखील फार रंजक आहे. १९ व्या शतकात अनेक महान व्यक्तिंनी जन्म घेतला ज्या आपल्या कार्यकर्तृत्व आणि लोकप्रियतेच्या बळावर देवत्वास प्राप्त झाल्या यापैकीच धावजी पाटील एक !            स्त्री जितकी मातृदेवता म्हणून प्रसिद्ध झाली, तितकेच तिचे संहारक रुपही प्रसिद्धीस पावले. याच‌ अघोरी रुपाचे नाव म्हणजे " काली ". काली हि अघोरी, तंत्रविद्या, जारण मारण आणि काळ्या जादूची आद्य देवता. या महाकालीचे मुख्य ठिकाण म्हणजे कलकत्ता/बंगाल, आणि याच मुळे काळी जादू हि बंगाली विद्या या नावाने देखील प्रसिद्धी पावली. संपुर्ण भारतवर्षात काली विविध नावांनी लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात तिचे उग्र रूप काहीसे सौम्य झाले आणि काली " काळुबाई " म्हणून पुजली जाऊ लागली. मध्यप्रदेशात धारची " ग...

दत्तात्रेय आणि दत्त संप्रदाय

Image
दत्तात्रेय आणि दत्त संप्रदाय हिंदू धर्मातील ऋषी, सन्यासी, योगी आणि दैवत म्हणून दत्तात्रेयांकडे पाहिले जाते. सप्त‌र्षींपैकी एक असणाऱ्या "ब्रम्हर्षी अत्रि" आणि सात पवित्र पतिव्रता स्त्रियांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या "सति अनुसुया" यांच्या पोटी दत्तांचा जन्म झाला.  अत्रिंनी अग्नी, इंद्र आणि इतर वैदिक दैवतांवर अनेक श्लोकांची रचना केली. ऋग्वेदात सर्वात जास्त उल्लेख असणारे ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलास "अत्रि मंडल" म्हणून ओळखले जाते, ऋग्वेदातील ८७ श्लोक अत्रि आणि त्यांच्या वंशजांना समर्पित आहेत. ऋषी अत्रिंना तीन पुत्र होते, पैकी "चंद्र" ब्रम्हाचा, "दत्त" विष्णुचा आणि "दुर्वास" शिवाचा अवतार मानले जातात. चंद्रपासून चंद्रवंशाची उत्पत्ती झाल्याने अत्रि हे चंद्रवंशीयांचे "गोत्र" मानले जाते.                महाराष्ट्रात दत्त मुर्तीची रचना त्रिमुखी आणि सहा हात असणारी अशी आहे पण माहूर सारख्या अनेक मध्ययुगीन मंदिरांमध्ये आणि अग्निपुराणातील मुर्तीशास्त्रानुसार दत्त मुर्ती एकमुखी आणि दोन हात असणारी ...

अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा...

Image
एक अपरिचित इतिहास...‌  अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा...         आदिलशाहीच्या मदमस्त हत्ती अफजल खानाने तुळजापूर, पंढरपूर आपल्या पायाखाली तुडवत कृष्णेच्या खोऱ्यात वाईमध्ये तळ ठोकला. मराठ्यांना कायमच हाताशी धरून राहिलेल्या आदिलशाहीचे हे क्रौर्याचे स्वरुप सर्वांसाठीच नवीन होते. पण अफजल खान मदोन्मत्त हत्तीप्रमाणे चौखूर उधळत होता त्याला अंगावर घेण्याची हिम्मत करायला कोणीच तयार होत नव्हते. औरंगजेबाला कैद करण्याची मनीषा बाळगणारा अफजल खान किती ताकदवान असेल याची कल्पना करता येते.                असा हा खान वाईला अजगरासारखा विळखा घालून बसला होता. यातच वाईतील सर्वात सधन कसबा असणाऱ्या भुईंजवर अफजल खानाची सैतानी नजर पडली नसती तर नवलच... इकडे शिवरायांशी प्रतागडावर गाठीभेटी ठरत होत्या तर तिकडे खानाचे सैनिक भुईंज मध्ये घुसत होते. यातच जाधवरावांचे कर्ते पुरुष गावात नव्हते, पण जाधवरावांच्या गौरवशाली परंपरेनुसार जाधवरावांच्या स्त्रीयांनीच...

महालक्ष्मीच्या पायरीला कृष्णामाईचा स्पर्श झाला आणि कोल्हापूर-सांगलीचा महापूर ओसरला

Image
भुईंजनिवासीनी (वाई.सातारा) महालक्ष्मी मंदिराच्या पाचव्या पायरीला कृष्णामाईच्या पाण्याचा स्पर्श झाला की महापूर व ओसरतो अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. अशीच एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे कृष्णजन्माची... आपल्या कृष्णजन्म कथेमध्ये असे आहे की कंसमामापासून वाचविण्यासाठी, पिता वसुदेव नवजात श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करायला नदीत शिरतो. यमुनेला महापूर आल्याने पलीकडे श्रीकृष्णाला सुखरूप न्यायचे कसे ? पाण्याची पातळी तर वेगाने वर चढत असते. पण ज्याक्षणी पाण्याचा स्पर्श, श्रीकृष्णाच्या पायांना होतो त्याच क्षणी चमत्कार घडतो. देवाचा चरणस्पर्श झाल्यावर यमुना नदीच्या पुराचे पाणी वेगाने ओसरते आणि वसुदेव आपल्या श्रीकृष्णाला सुरक्षितपणे पलीकडे घेऊन जातो. द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली मकरंद करंदीकर यांच्या संग्रहातील एक ...