Posts

देवराज्य आणि देवभाषा

Image
 “ संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत (मराठी) काय चोरापासून झाली " असे संत एकनाथ महाराज संस्कृतास मोठेपण देऊन मराठीस दुय्यम स्थान देणाऱ्या पढतमुर्खांना खडसावून विचारतात. मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबा तर अजिबात थकत नाहीत, "माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके ||" म्हणत देवाच्या मुखीचे ज्ञान अमृतसम  देवभाषेत ' भावार्थदीपिका ' अर्थात ज्ञानेश्वरी च्या रुपाने त्यांनी या देवराज्यास सुलभ केले.              सातवाहन हे सर्वात प्राचीन मराठी भाषिक राज्यकर्ते समजले जातात. मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती' हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. तर मुकुंदराजाने इ.स. १११० च्या सुमारास ' विवेकसिंधु ' हा वेदांतावरील टीकात्मक ग्रंथ लिहिला. या कालखंडात पर्यंत मराठी हि देववाणी इथल्या जनमाणसांची सामान्य वापरातील भाषा झाली होती तथापि धर्मग्रंथांवर अजूनही संस्कृताचा पगडा फार मोठा होता. त्यामुळे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना समजेल अशा मराठी बोलीतून क...

कृष्णार्जुन

Image
 कृष्णार्जुन  प्रेमाच्या विविध संकल्पना आणि व्याख्या जगभरात प्रसिद्ध आहेत. ‘आपल्या स्वत्वाच्या पलिकडे जाऊन आपण ज्याचा विचार किंवा काळजी करतो, आयुष्यातील चांगला आणि वाईट प्रसंग सर्वात आधी ज्याच्याशी बोलावा वाटतो, ज्याच्या आयुष्यात फक्त चांगले व्हावे अशी आपली प्रार्थना असते किंवा त्यासाठी आपण झटत असतो, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो’ अशी सहजपणे प्रेमाची व्याख्या मी करु शकतो. आई-आपत्याचे, वडिल-आपत्याचे, भावंडांचे, मैत्रीचे, जोडप्याचे असे प्रेमाचे ठोस काही प्रकार आहेत पण यात सामान्यपणे सर्वोच्च मानले जाते ते एखाद्या जोडप्याचे प्रेम ! याचे कारण की फक्त हेच प्रेम प्रेमाच्या मानसिक अवस्थेपुढे जाऊन शरीरापर्यंत पोहचते. तरीही या प्रेमास धटक देण्याची ताकद ठेवते ते मैत्री प्रेम. रक्त, शरीर अशा कोणत्याही दुव्यापलीकडे फक्त मनाने जोडलेला हा बंध.              जगात मैत्रीची अनेक उत्तमोत्तम उदाहरणे आहेत पण यातील सर्वश्रेष्ठ म्हणावे असे उदाहरण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. तसे सर्वसाधारणपणे महाभारतात सर्वोत्तम मैत्रीसाठी कर्णाचे उदाहरण दिले जाते पण मला अर्जुनाची मैत्...

लागली समाधी ज्ञानेशाची..

Image
 आळंदीत आज भलतीच गजबज उडाली होती. गेले काही दिवस नामदेव, गोरोबाकाका, सावतामाळी, चांगदेव, वटेश्वर, विसोबा खेचर अशा संतसमुदायासह स्वयं विठ्ठल परमात्मा अलंकापुरीत उपस्थित होते. वैष्णवजनांची दाटी झाली होती, कार्तिकीची वद्य एकादशी पंढरी सोडून आळंदीत सजली होती. कशासाठी ? कुणासाठी ? ज्ञाना!  वीस बावीस वर्षांचं कोवळं पोरगं समाधी घेणार..  फार लहान होती ओ लेकरं.. जेव्हा कळलं की आईबाप आपल्यासाठी, आपल्याला सोडून गेलेत. खरंतर हे कळण्याइतकही वय नव्हतं त्यांचं.  सकाळच्या प्रहरी दोघेही कुठे दिसेनात म्हणून ज्ञाना, सोपान आणि इवलुशी मुक्ता सबंध आळंदी पालथी घालत होती. इथे खोपटीत एकटा निवृत्ती उर भरून बसला होता पण हुंदका काही बाहेर येत नव्हता..  शेवटी कळलं आईबाबा गेले.. देहांत प्रायश्चित घेतलं..! तिघही पळत येऊन निवृत्तीच्या पोटास बिलगली. किती किती रडली असतील ती एवढीशी पिल्लं..  पण तरीही नियतीप्रमाणे निवृत्तीही अगदी स्तब्ध होता. ज्ञानाने ओळखले.. दोन्ही लेकरं उराशी धरली आणि तिथे पहिल्यांदा ज्ञानेश्वर 'माऊली' झाला. गहिनीनाथांकडून नाथपंथी दिक्षा स्वीकारलेल्या निवृत्तीची ब्रह्मानंद...

च्या

Image
 चा  दिवसाची तजेलदार सुरवात किंवा गप्पांची मैफिल ज्या गोष्टीशिवाय होत नाही त्यो म्हंजे चा..! आपल्याला सांगून पटायचं न्हाय, पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्याला चा दिड-दोनशे वर्षांमागं आपल्याला माहिती सुदा नव्हता. आवो एवढंच काय तर जगाला सुदा चारशे वर्षांमागं चा ची वळख नव्हती. ते चीन तेवढा मात्र दाबून चा प्यायचा..          असं म्हणत्यात की इ.स. पुर्व २७३७ मधी चीनचा राजा शैन नुंग येकदा गरम पाणी पेत होता तेवढ्यात कुठणं तरी उडून एक चहाच सुकलेलं पान त्याच्या गल्लासात पडलं. त्यामुळं त्या पाण्याला आल्याला वास, रंग आणि चव राजाला यवढी आवाडली, की गडी रोज तसाच पाणी पिऊ लागला आणि आशी झाली चहाची सुरुवात.. पण या बाटग्या मिचकुल्या डोळ्याच्यांनी, जगापास्न लय लपवून ठेवला चा...   इ.स. १६१० मधी डचांनी चा युरोपात नेला आणि मग त्यो येवढा प्रसिद्ध झाला की, आज‌घडीला पाण्याखालोखाल पेलं जाणारं दुसरं पेय म्हणजी चहा..  चीनमधी याला 'छा' म्हणायची त्यामुळ जगात बऱ्याच ठिकाणी चा, चहा, छा, चाय अशाच नावांनी वळखत्यात  भारतात चा आला इंग्रजांमुळं! पुन्हा चिन्यांनी चा ...

एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान

Image
एकेश्वरवादी, इस्लाम आणि दख्खनी मुसलमान एकाच परब्रह्म ईश्वराला मानणाऱ्या लोकांना एकेश्वरवादी म्हणतात. जगात आजवर अनेक एकेश्वरवादी धर्म-पंथ उदयास आले. यात एकच निराकार ईश्वर मानणारे किंवा एका प्रमुख ईश्वराच्या अधिपत्याखाली इतर देव मानणारे असे उपप्रकार केले जाऊ शकतात. भारतात देखील असे अनेक धर्म वेळोवेळी उदयास आल्याचे आणि पुढे जाऊन या भुमीतील शास्वत बहुऐश्वरवादात विलीन झाल्याचे पहायला मिळतात.  इ.स.पुर्व ५०० मध्ये बहुऐश्वरवादी मिस्रच्या (इजिप्त) गुलामगिरीत असलेल्या बहुऐश्वरवादी यहुदी लोकांमध्ये मुसा (मोझेस) याने त्यांच्या देवांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या 'यहोवा' ने एका पर्वतावर आपल्याला नवीन धर्माज्ञा दिल्याचे सांगितले. काही धर्मगुरूंनी तोच प्रचार लावून धरला आणि एकेश्वरवादाची बीजे रोवली. पुढे गुलामगिरीतून मुक्त होऊन जेरुसलेमला आलेल्या यहुदींनी बहुऐश्वरवादाचा आणि मुर्तीपुजेचा तिरस्कार करत एकमेव निराकार निर्गुण ईश्वराची सत्ता मान्य केली. मुसा आणि त्यानंतर झालेल्या विविध नबींनी बायबलचा जुना करार प्रसिद्ध केला. लवकरच सर्व लोक या 'खऱ्या धर्माचे' आश्रित होतील या विश्वासाने त्यांनी ...

भृगुऋषींची आरती

भृगुऋषींची आरती‌ श्री क्षेत्र भुईंज त्रिभुवनी पावन | समाधिस्थ भृगूऋषी तिथे संजिवन || चंद्रिका-कृष्णा संगमी इंदू वळण | तेथे त्वा केलेसी अजरामर स्थान ||१|| जय देव जय देव, जय ऋषी महर्षी भृगुऋषी राजा | आरती ओवाळू सायुज्य द्विजा || धृ.|| जय देव जय देव  कल्पारंभी जेव्हा ब्रह्म गडबडला | सप्तर्षी प्रजापती भार्गव निर्मिला || मंदाकिनी स्थापूनी निश्चिंत केला | लत्थाघाते विष्णू चरणी लागला ||२|| जय देव जय देव,  वेद स्मृती शास्त्र पुराणे रचली | अवनीवरती आद्य अग्नी चेतविली || दर्शनमात्रे नवग्रह पिडा हरली | नारायण आण्णांनी समाधी उद्धरली ||३|| जय देव जय देव, गाणपत्य शैवा वैष्णव आधारा | देव मानव राक्षस चराचर उद्धारा || महालक्ष्मी तिष्ठली पाठी निर्धारा | भक्तगण स्वप्नील मुक्तीपथी तारा ||४|| जय देव जय देव, अर्थ  तिन्ही लोकात पवित्र समजले जाणारे भुईंज नावाचे एक तिर्थक्षेत्र आहे. तिथे आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी संजीवन समाधी घेऊन आजही नित्यनेमाने तप करत आहेत. (स्कंदपुराण) चंद्रिका आणि कृष्णेच्या संगमी संपूर्ण विष्णू रुप असलेली कृष्णा नदी परम् पवित्र असे चंद्राकार वळण घेते‌. तेच स्थान तुम्ही (भृगुऋषी...

आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज

Image
 आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज  आणि कृष्णा-वेण्णा-कोयनादी पंचगंगा उत्पत्ती..  गणपती हे निराकार परब्रह्माचे साकार स्वरुप असून याच ॐकार गणपतीपासून ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आणि संपूर्ण चराचर सृष्टी उत्पन्न झाली अशी धारणा असणाऱ्या व श्री महागणपतीची उपासना करणाऱ्या उपासकांना ‘गाणपत्य’ म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मातील पाच प्रमुख संप्रदायांपैकी गाणपत्य हा एक आहे. याच गाणपत्य संप्रदायांचा आद्य ग्रंथ समजला जाणाऱ्या ‘श्री गणेश महापुराणाची’ रचना आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी महाराजांनी केली.  हे गणेश महापुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला स्फुरले त्यांनी ते वेदव्यासांना सांगितले. व्यासांनी त्याचा उपदेश भृगुऋषींना केला आणि पुर्वजन्मव्याधिने ग्रस्त सौराष्ट्राचा राजा सोमकांताला उपदेश करताना महर्षी भृगू यांच्या संवादातून श्री गणेश महापुराणाची रचना झाली.  आचार्य श्रेष्ठ भृगुऋषी महाराज                  गणेश पुराणाच्या सुरुवातीच्या आध्यायांमध्ये जी कथा येते ती याप्रमाणे - सौराष्ट्रातील देवनगरचा राजा सोमकांत पुर्वजन्म कर्माने व्याधीत ...