Posts

शेखमिरा संस्थान

Image
 Nawab of Wai  The princely State of pasarni  नवाब बंगला पसरणी सत्यार्थाने या नवाबास पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जाते, तथापि भारतात अनेक ठिकाणी वाईचे नवाब या नावानेही यांचे उल्लेख येतात.  वाई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो दक्षिण काशी या बिरूदावलीने नटलेला हिंदू तीर्थक्षेत्राचा समृद्ध प्रदेश !  कृष्णमाईच्या पवित्र काठावर मंदिरांच्या दाटीवाटीने वसलेल्या या शहराच्या अगदी जवळच मुस्लीम शासकांचे संस्थान नांदत होते हे अगदी अविश्वसनीय वाटावे असे सत्य आहे. वाई शहराला अगदी खेटून महाबळेश्वरला जाणाऱ्या घाटात पसरणी नावाच्या टुमदार गावात या नवाबांची राजधानी होती. या घराण्यास "शेखमिरा" संस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या घराण्यास शेखमिरा हे नाव त्याच्या मूळपुरुषावरुन पडले. स्वराज्याच्या सैन्यातील शेखमिरा हा एक मावळा. इ.स.१७०७ साली शंभूपुत्र थोरले शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून मुक्त झाले आणि स्वराज्यात आले. छत्रपती पदावरून शाहूमहाराज व ताराराणींचा खटका उडाला व शाहू महाराजांनी आपला अधिकार घेण्यासाठी युद्धाची सुरुवात केली. मजल दर मजल करत शाहू चंदन-वंदन किल्यावर येऊन पोह...

चंदनाला साप कवटाळी

Image
  चंदनाला साप कवटाळी  मनुष्याच्या संसारीक आणि अध्यात्मिक आचरणास सर्वात योग्य संप्रदाय आजमितीस कोणता अस्तित्वात असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय ! वारी करणारा म्हणजे 'वारकरी' इतकी सहज याची व्याख्या आहे. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||" नामदेवांच्या या अभंगात आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्या करण्याचा नेम स्वतः पांडुरंग घालून देतोय असे उद्धृत केले आहे. हि वारी कुणी सुरू केली हे ठामपणे सांगता येत नाही. ज्ञानेश्वरांचे वडील देखील वारी करत असत असा उल्लेख येतो. तथापि संत बहिणाबाईंच्या अभंगात वारकरी संप्रदायाची घडणावळ येते ती पुढीलप्रमाणे-          संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।         ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।         नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।         जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।         तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।...

छत्रपती गादी

Image
 छत्रपती गादी  भाग २  हिंदू धर्मशास्त्रानुसार दत्तक पुत्र पोटच्या पुत्राइतकाच औरस मानला जातो आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये समानच असतात. साधारणतः रक्ताचा किंवा स्वकुळातील मुलगा दत्तक घेण्याचा दंडक प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पाहिले की शिवछत्रपतींनंतर सातारा गादीवर चौथ्या पिढीत तर करवीर गादीवर तिसऱ्याच पिढीत दत्तक वारस विराजमान झाले. दोघेही स्वकुळातील अर्थात भोसले कुळातीलच होते.  छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनंतर नानासाहेब पेशव्याने सातारचे सर्वाधिकार पुण्यास हलवल्यावर पेशव्यांची सत्ता उन्मत्त होऊ लागली. सातारा व करवीर अशा दोन्ही छत्रपतींना आपले स्वातंत्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी पेशव्यांशी दिर्घकालीन लढा द्यावा लागला.  सातारच्या शाहूपुत्र छत्रपती रामराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी वावीकर भोसले घराण्यातील विठोजी भोसले या मुलास दत्तक घेऊन त्यांचे दुसरे शाहू असे नामकरण केले. आपल्या दत्तक पित्याप्रमाणे छत्रपती दुसरे शाहू अर्थात आबासाहेब महाराज फक्त नामधारी राज्यकर्ते होते. पुण्यात प्रधान पेशव्यांमध्ये सत्तासंघर्षाचा कलह माजला होता, सवाई माधवरावास पेशवा केल्यावर बा...

छत्रपती गादी

Image
 छत्रपती गादी  क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपतींनी स्वतःस राजाभिषेक करवून घेत राज्यारोहण केले आणि या भूमंडळावर नवे साम्राज्य जन्मास घातले. स्वराज्याच्या स्वतंत्र लढ्यास राज्याभिषेकाने पूर्णत्व प्राप्त झाले. आजमितीस राज्याधिकार नसले तरी छत्रपती गादी अबाधित आहे. आजवर झालेल्या छत्रपती आणि त्यांच्या सत्तासंघर्षाचा थोडक्यात घेतलेला आढावा म्हणजे 'छत्रपती गादी.' भाग १ राजसिंहासनास महाराष्ट्रात "गादी/तख्त" हा शब्द प्रसिद्ध आहे. यातील तख्त हा फारसी शब्द आहे. फिरंग्यांप्रमाणे महाराष्ट्रात (भारतात) खुर्चीसारखी सिंहासने नसून ती पसरट व साधारणतः आयताकार असून त्यावर गादी अंथरुण वर विविध उंची सुवर्णजडीत वैगरे वस्त्रे अंथरुण त्यावर राजा सुखासनात विराजमान होत असे. सिंहासनावर अंथरलेल्या गादीवरुनच या आसनास "गादी" हेच नाव रुजु झाले असावे. वरकरणी ही गादी सामान्य वाटत असली तरी ती त्यावर बसणाऱ्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीसही त्या राज्याचा सर्वशक्तिमान ईश्वर बनवत असे. म्हणूनच ही गादी नाती, मुल्य, भावना यांच्या लालभडक रक्ताभिषेकाने कायम रंगीत असायची.  श्रीमंत कैलासवासी थोरले स्वा...

नरसोबा | सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत

Image
 नरसोबा  सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत  आपल्याकडे बहुतांश समाजात शक्यतो भैरवस्वरुप शैव (शिव‌-अवतारी) कुळदैवते आढळतात, तर खास करुन कोकणस्थ ब्राह्मणांमध्येच वैष्णव (विष्णू अवतारी) कुळदैवते असतात. विष्णूचा चतुर्थ अवतार असलेला नरसिंह/नृसिंह तर ब्राम्हणांचेच कुळदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात कर्नाटक सीमाभागात हाच नरसिंह नरसोबा रुपात ब्राम्हणांसह मराठा तसेच बारा बलुतेदार समाजासोबतच जैनांचे देखील कुळदैवत आहे.  महाराष्ट्रात विविध कालखंडात बांधलेली नरसिंहाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, ज्यामध्ये केवल-नरसिंह, उग्र नरसिंह, लक्ष्मी नरसिंह अशा प्रकारातील नरसिंहाच्या मुर्ती स्थापित आहेत. ज्या दशावतारी विष्णूच्या चौथ्या अवताराची साक्ष देतात.  नरसोबाचे या नरसिंहाहून स्वतःचे असे एक वेगळेपण आहे. याची स्थाने प्राचीन असून ती तांदळा स्वरुपात आहेत. विशेष म्हणजे नरसोबा या रुपात तो फक्त विष्णू-अवतार नसून त्यात रुद्रांश (शिव-अंश) देखील असल्याचे मानले जाते. अर्थात हा नरसोबा विष्णू आणि शिवाचे एकत्रित स्वरुप आहे. दशावताराहून पलिकडे हा नरसोबा एक लोकदैवत म्हणून खंडोबा/जोतिबा प्रमाण...

श्रीरामभक्त भुईंजकर जाधवराव घराणें आणि रामदासी संप्रदाय...

Image
 .                         🌙 श्री ☀️                        श्री मार्तंड चरणी                         दृढभाव खंडोजी                         सुत रायाजी जाध                               व राव  श्रीरामभक्त भुईंजकर जाधवराव घराणें आणि रामदासी संप्रदाय.  भुईंजच्या जाधवराव घराण्याच्या मस्तकीचा मुकुटमणी म्हणजे श्रीमंत रायाजीराजे जाधवराव. शिवछत्रपतींचे मातुल आजोबा श्रीमंत लखुजीराजे यांचे खापर पणतू खंडोजीराजे यांचे रायाजीराजे हे सर्वात थोरले नातू होय. रायाजीराजे छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचे अत्यंत विश्वासू व सातारा दरबारातील मान्यवर सरदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना एकूण १५ लाख रुपये उत्पन्नाचा सरंजाम शाहू महाराजांनी दिलेला होता. (भुईंजमध्ये ...

देवराज्य आणि देवभाषा

Image
 “ संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत (मराठी) काय चोरापासून झाली " असे संत एकनाथ महाराज संस्कृतास मोठेपण देऊन मराठीस दुय्यम स्थान देणाऱ्या पढतमुर्खांना खडसावून विचारतात. मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबा तर अजिबात थकत नाहीत, "माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके ||" म्हणत देवाच्या मुखीचे ज्ञान अमृतसम  देवभाषेत ' भावार्थदीपिका ' अर्थात ज्ञानेश्वरी च्या रुपाने त्यांनी या देवराज्यास सुलभ केले.              सातवाहन हे सर्वात प्राचीन मराठी भाषिक राज्यकर्ते समजले जातात. मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती' हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. तर मुकुंदराजाने इ.स. १११० च्या सुमारास ' विवेकसिंधु ' हा वेदांतावरील टीकात्मक ग्रंथ लिहिला. या कालखंडात पर्यंत मराठी हि देववाणी इथल्या जनमाणसांची सामान्य वापरातील भाषा झाली होती तथापि धर्मग्रंथांवर अजूनही संस्कृताचा पगडा फार मोठा होता. त्यामुळे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना समजेल अशा मराठी बोलीतून क...